क्रांतिदिनी रंगमंचावर ‘ऑगस्ट क्रांति’ नाटकाचे सादरीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST2021-08-12T04:11:45+5:302021-08-12T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्रांतिदिनी ऑगस्ट क्रांतिवर आधारित ‘ऑगस्ट क्रांति’ या नाटकाचे सादरीकरण दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक परिसराच्या ...

क्रांतिदिनी रंगमंचावर ‘ऑगस्ट क्रांति’ नाटकाचे सादरीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्रांतिदिनी ऑगस्ट क्रांतिवर आधारित ‘ऑगस्ट क्रांति’ या नाटकाचे सादरीकरण दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक परिसराच्या आवारात राष्ट्रभाषा परिवारच्या वतीने करण्यात आले.
एकीकडे रंगमंचाचा पडदा उघडण्यासाठी क्रांतिदिनी राज्यभरात ‘मी रंगकर्मी’ आंदोलनात हजारो रंगकर्मी रस्त्यावर उतरले होते आणि त्याच दिवशी नागपुरात रंगमंचाचा पडदा उघडण्यात आला. हा एक योगायोग ठरला. सद्यस्थितीत शासकीय नियमानुसार दुपारी ४ वाजतापर्यंतच कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन मर्यादित उपस्थितांच्या साक्षीने करण्याची परवानगी आहे. शिवाय, नाट्यगृह बंद असल्याने नाटकाचे सादरीकरण शक्य नव्हते. यात तोडगा काढत दमक्षेने शासकीय वेळेपूर्वी आपल्याच परिसरातील सभागृहात रंगमंच उभारून नाट्य सादरीकरणाचे आयोजन केले. उद्घाटन अ.भा.मराठी नाट्य परिषदेचे प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर, ज्येष्ठ रंगकर्मी दीपाली घोंगे, पालकमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यशवंत मोहिते, ज्येष्ठ रंगकर्मी प्रमोद भुसारी, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील व दमक्षेचे संचालक डॉ. दीपक खिरवडकर यांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांना इशारा देणाऱ्या १९४२ च्या ‘भारत छोडो आंदोलना’वर आधारित ‘ऑगस्ट क्रांति’ या नाटकाचे लेखन रूपेश पवार व पुष्पक भट यांनी केले तर, दिग्दर्शन रूपेश पवार यांचे होते. यात पुष्पक भट, अश्लेष जामरे, आकांक्षा कामडे यांच्यासह ३० हून अधिक कलावंतांचा समावेश होता. उद्घाटन सोहळ्याचे निवेदन कार्यक्रम प्रभारी दीपक पाटील यांनी केले.
...............