बाधितांचा टक्का आणखी वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:09 IST2021-03-24T04:09:02+5:302021-03-24T04:09:02+5:30

सावनेर/कामठी/काटोल/नरखेड/ कळमेश्वर/कुही/उमरेड/रामटेक/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा टक्का सातत्याने वाढतोय. जिल्हातील १३ तालुक्यात मंगळवारी ८१९ रुग्णांची नोंद झाली. ...

The percentage of victims increased even more | बाधितांचा टक्का आणखी वाढला

बाधितांचा टक्का आणखी वाढला

सावनेर/कामठी/काटोल/नरखेड/ कळमेश्वर/कुही/उमरेड/रामटेक/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा टक्का सातत्याने वाढतोय. जिल्हातील १३ तालुक्यात मंगळवारी ८१९ रुग्णांची नोंद झाली. यात एकट्या सावनेर तालुक्यातील २२३ रुग्णांचा समावेश आहे. मंगळवारी सावनेर शहरात ८६ तर ग्रामीण भागात १३७ रुग्णांची नोंद झाली. यासोबतच ४ रुग्णांचा मृत्यू झाला.

हिंगणा तालुक्यात ७१८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ३७, डिगडोह (१२), रायपूर (५), कान्होलीबारा (४), नागलवाडी, हिंगणा व देवळी येथे प्रत्येकी ३, निलडोह, वडधामना, इसासनी येथे प्रत्येकी २ तर अडेगाव, सुकळी कलार, टाकळघाट, आमगाव, मांडवघोराड, सुकळी गुपचूप व किन्ही धानोली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या ५,२४६ इतकी झाली आहे. यातील ४,२०३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

काटोल तालुक्यात ६३ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४८ तर ग्रामीण भागातील १५ रुग्णांचा समावेश आहे. काटोल शहरात पंचवटी येथे सात, आययुडीपी (६), खंते ले-आऊट व काळे चौक येथे प्रत्येकी चार, जानकीनगर (३), जैनमंदिर, पेठबुधवारा शनिचौक येथे प्रत्येकी दोन तर चांडकनगर, थोमा ले-आऊट, हेटी, सरस्वतीनगर, राठी ले-आऊट, हनुमाननगर, सगमानगर, पुरुषोत्तम मंदिर, तारबाजार, लक्ष्मीनगर, नबीरा ले-आऊट, द्वारकानगरी, होळी मैदान, गळपुरा, रेवतकर ले-आऊट, धंतोली, रामदेवबाबा ले-आऊट, हत्तीखाना येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागामध्ये कोंढाळी, कलंबा येथे प्रत्येकी तीन तर दुधाळा, लाखोळी, लाडगाव, येरला (धोटे), वाढोणा, मसली, इसापूर

(खुर्द), वंडली, कुकडी, पांजरा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

नरखेड तालुक्यातील ग्रामीण भागात संक्रमणाचे प्रमाण अधिक आहे. मंगळवारी नरखेड शहरात १ तर ग्रामीण भागात १२ रुग्णांची नोंद झाली. सध्या ग्रामीण भागातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३४६ तर शहरातील ५७ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात मोवाड, जलालखेडा येथे प्रत्येकी ३, सावरगाव (२), नारसिंगी, थाटूरवाडा, थडीपवनी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

कन्हान येथे २० रुग्णांची भर पडली. कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत १२८० बाधितांची नोंद झाली आहे. यातील ९८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २५९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांनी दिली.

उमरेड तालुक्यात २० रुग्णांची भर पडली. यात शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे.

कुही तालुक्यातील कुही, मांढळ, वेलतूर व साळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी १२३ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या. तीत १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ९०० इतकी झाली आहे. यातील ७०३ रुग्ण बरे झाले आहेत.

रामटेक तालुक्यात १० रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील टिळक वॉर्ड येथे ३, शिवाजी वॉर्ड व रामाळेश्वर वॉर्ड येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. ग्रामीण भागात दुलारा येथे दोन तर पंचाळा, शीतलवाडी, मनसर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत १४४६ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील १११३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, ५१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी दिली.

कळमेश्वर तालुका डेंजर झोनमध्ये

कळमेश्वर तालुक्यात ९६ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील तीन तर ग्रामीण भागातील ९३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात धापेवाडा, पिपळा, सावळी बु. येथे प्रत्येकी ११, मोहपा, गोंडखैरी येथे प्रत्येकी १०, सोनपूर (८), भडांगी (७), खापरी (३), धापेवाडा खु., घोराड, परसोडी, पानउबाळी, म्हसेपठार, लोणारा येथे प्रत्येकी दोन तर वाढोणा, खैरी, लखमा, वरोडा, कोहळी, मांडवी, सवंद्री, सेलू, केतापार, सावंगी तोमर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

Web Title: The percentage of victims increased even more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.