लाल दिव्यापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा

By Admin | Updated: April 20, 2017 02:48 IST2017-04-20T02:48:43+5:302017-04-20T02:48:43+5:30

मंत्री आणि अधिकारी यांच्या गाडीवरील लाल दिवा १ मे पासून काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.

People's faith is more important than red light | लाल दिव्यापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा

लाल दिव्यापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा

पालकमंत्र्यांनी काढला लाल दिवा
नागपूर : मंत्री आणि अधिकारी यांच्या गाडीवरील लाल दिवा १ मे पासून काढण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत करून पालकमंत्री यांनी आपल्या गाडीवरील लाल दिवा काढला. जनसेवेसाठी लाल दिव्यापेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवारी राळेगण सिद्धीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंत्री आणि अधिकारी यांच्या वाहनावरील लाल दिवा काढण्याबाबतचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी या निर्णयाचे स्वागत करून आपल्या वाहनावरील लाल दिवा तात्काळ काढून ठेवला. (प्रतिनिधी)

Web Title: People's faith is more important than red light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.