जनतेच्या समस्या ‘घेऊन जा ऽऽ गे मारबत...’!!

By Admin | Updated: August 27, 2014 00:55 IST2014-08-27T00:55:06+5:302014-08-27T00:55:06+5:30

डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई...ढोलताशांचा कर्णकर्कश्श आवाज...मनातल्या भावनांचा निचरा करणाऱ्या दमदार घोषणा...बेधुंद नृत्याचा जल्लोष...आणि काही नेत्यांवरचा राग व्यक्त करताना

People should take 'Problems with me ...' !! | जनतेच्या समस्या ‘घेऊन जा ऽऽ गे मारबत...’!!

जनतेच्या समस्या ‘घेऊन जा ऽऽ गे मारबत...’!!

परंपरेत अनेक समस्यांवर प्रहार : उत्साहात मारबत, बडग्यांची मिरवणूक
नागपूर : डीजेच्या तालावर नाचणारी तरुणाई...ढोलताशांचा कर्णकर्कश्श आवाज...मनातल्या भावनांचा निचरा करणाऱ्या दमदार घोषणा...बेधुंद नृत्याचा जल्लोष...आणि काही नेत्यांवरचा राग व्यक्त करताना त्यांच्या नावाने काढण्यात आलेल्या बडग्यांना चपलांनी मारण्याचे सुख अनुभवत मंगळवारचा मारबत उत्सव रंगला.
तब्बल १३३ वर्षांपासून अव्याहतपणे चालू असणारी ही परंपरा आहे. केवळ नागपुरातच काढण्यात येणाऱ्या या मारबत उत्सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला राग आणि संताप व्यक्त होत होता. प्रचंड गर्दी, उंट, घोडे, संदल, वाजंत्रीच्या तालावर उन्मादक नृत्याचा आनंद घेत प्रामुख्याने युवकांनी या उत्सवात लक्षणीय सहभाग घेतला.
पाडव्याचा सण साजरा करताना अनेक मंडळांनी आपल्या मनातील संताप व्यक्त करताना तब्बल १७ बडग्यांच्या माध्यमातून अनेक मुद्यांवर आपला आक्रोश व्यक्त केला. यात पाकिस्तान आणि चीनची घुसखोरी, पाकिस्तानचा सीमाभागात होणाऱ्या गोळीबाराचा निषेध, जनतेवर बुरे दिन लादणारे सरकार, वेगळ्या विदर्भाच्या नावाने जनतेशी दगा करणारे नेते, विदर्भद्रोही लोक, बलात्कारी बाबा, आसाराम बापूंच्या कृत्याचा निषेध, भ्रष्टाचार करणारे राजकीय नेते आदींचा निषेध व्यक्त करण्यात आला. केवळ नागपूरकरच नव्हे तर विदर्भ आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील नागरिकही या उत्सवासाठी खास नागपुरात आले होते. (प्रतिनिधी)

Web Title: People should take 'Problems with me ...' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.