शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
3
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
4
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
6
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
7
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
8
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
9
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
10
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
11
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
12
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
13
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
14
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
15
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
16
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
17
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
18
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
19
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
20
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील लोकांना थायलंडमध्ये प्रशिक्षणाची संधी ! थायलंडच्या धम्मकाया विद्यापीठाचे केंद्र शांतिवन चिचोलीत होणार

By आनंद डेकाटे | Updated: December 5, 2025 17:47 IST

Nagpur : भंते किट्टीपोंग यांनी सांगितले की, बौद्ध धम्म हा जगभरात पसरलेला आहे. प्रत्येक देशात बौद्ध धम्माचे अनुयायी हे आपापल्या पद्धतीने बुद्धाचे विचार तत्वज्ञान मांडत असतात.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थायलंड येथील जगविख्यात धम्मकाया फाऊंडेशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या धम्मकाया ओपन युनिर्व्हसिटीचे एक उपकेंद्र नागपुरातील शांतिवन चिचोली येथे सुरू करण्यात येत असल्याची माहिती धम्मकाया फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय संबंध प्रमुख भंते किट्टीपोंग हेमवामसो यांनी शुक्रवारी शांतिवन चिचोली येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी शांतिवन चिचोलीचे विश्वस्त संजय पाटील उपस्थित होते. 

भंते किट्टीपोंग यांनी सांगितले की, बौद्ध धम्म हा जगभरात पसरलेला आहे. प्रत्येक देशात बौद्ध धम्माचे अनुयायी हे आपापल्या पद्धतीने बुद्धाचे विचार तत्वज्ञान मांडत असतात. परंतु बुद्धाचे विचार हे एकच आहे. बुद्धांचे ते मुळ विचार लोकांपर्यंत जाण्यासाठी जगभरातील बौद्धांची एकच संस्कृती निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने धम्मकाया फाऊंडेशन कार्य करीत आहे. धम्मकाया फाऊंडेशनतर्फे चालवण्यात येणाऱ्या धम्मकाया ओपन युनिर्व्हसिटीमध्ये बौद्ध धम्माच्या संबंधितविविध अभ्यासक्रम शिकवले जातात. ते अभ्यासक्रम आता शांतिवन चिचोलीमध्ये सुद्धा शिकवले जातील. यात वयाचे कुठलेही बंधन नाही. नागपूर विदर्भातील लोकांना थायलंडमध्ये सुद्धा अभ्यासक्र किंवा प्रशिक्षणाची संधी मिळेल. पत्रपरिषदेला शशिकांत राऊत, मंगेश बागडे, रेखा मून आदी उपस्थित होते. 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज भव्य अभिवादन 

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे शांतिवन चिचोली येथे भव्य अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली. याप्रसंगी थायलंडचे भंते किट्टीपोंग हेमवामसो, भंते पासुरा दंतमनो, डाॅ. संजय रामटेके मुख्य अतिथी राहतील. इंडियन बुद्धिस्ट कौन्सिलचे विश्वस्त चंद्रशेखर गोडबोले हे अध्यक्षस्थानी राहतील. दुपारी १२ वाजता धम्मदेसनेचा कार्यक्रम होईल. दुपारी २ वाजता  अविनाश दुपारे यांचे संगीतमय अभिवादन होईल. सायंकाळी ५.३० वाजता कॅंडलमार्च निघेल. 

रविवारी विशेष फुलपूजा

थायलंडमध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी विशेष अमिस पूजा म्हणजे फुलपूजा केली जाते. या रविवारी ७ डिसेंबर रोजी सुद्धा ही विशेष फुलपूजा केली जाणार असून त्याचवेळी ती जगभरात सुद्धा एकाच वेळी केली जाईल. शांतिवन चिचोली येथे रविवारी सकाळी ८ ते सकाळी ९.३० वाजेपर्यंतही फलपूजा चालेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Residents to Receive Thailand Training; Dhamma Kaya Center in Chicholi

Web Summary : Vidarbha residents will have access to Buddhist Dhamma training in Thailand, with a Dhamma Kaya Open University sub-center opening in Shantiwan Chicholi. Courses offered with no age limit. A Mahaparinirvan Diwas event will be held, also a special flower puja.
टॅग्स :nagpurनागपूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीEducationशिक्षण