शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

गावावरून विमान गेले तर लोक घाबरून पळायचे

By admin | Updated: August 6, 2015 02:45 IST

द्वितीय महायुद्धात अमेरिकेने पहिल्यांदाच अणुुबॉम्बचा वापर केला. जपानच्या हिरोशिमा या शहरावर ६ आॅगस्ट १९४५ मध्ये अणुबॉम्ब टाकण्यात आला.

हिरोशिमादिन : भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी जागवल्या आठवणी आनंद डेकाटे  नागपूरद्वितीय महायुद्धात अमेरिकेने पहिल्यांदाच अणुुबॉम्बचा वापर केला. जपानच्या हिरोशिमा या शहरावर ६ आॅगस्ट १९४५ मध्ये अणुबॉम्ब टाकण्यात आला. त्यानंतर पुन्हा तीन दिवसांनी नागासाकी या शहरावर दुसरा अणुुबॉम्ब टाकण्यात आला. या दोन्ही हल्ल्यात हजारो सैनिक आणि लाखो निरपराध नागरिक मारल्या गेले. अनेक वर्षे या हल्ल्याचे परिणाम कायम होते. या हल्ल्यात बेचिराख झालेले जपान पुन्हा सावरले. केवळ सावरलेच नाही तर जगातील विकसित देशांच्या पंक्तीत जाऊन बसले. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे मूळचे जपानचेच. इतिहासात पहिल्यांदा ज्या शहरावर अणुबॉम्ब टाकण्यात आला त्या हिरोशिमा शहराला लागून त्यांचे निमी (ओकायामा) हे गाव आहे. हिरोशिमा दिनाच्या निमित्ताने भदंत ससाई यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अणुबॉम्बच्या हल्ल्यावेळी आपल्या गावात अनुभवलेल्या आठवणींना उजाळा दिला.नागपूर : अमेरिकेने हिरोशिमा शहरावर अणुुबॉम्ब टाकला आणि त्यात लाखो लोक मारल्या गेल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली. सर्व वरिष्ठ मंडळी एकत्र आली. एकच चर्चा सुरू होती. ही चर्चा संपण्यापूर्वीच तीन दिवसांनी पुन्हा नागासाकी शहरावर दुसरा अणुुबॉम्ब टाकण्यात आला. त्यामुळे जपानच नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले होते. आमचे गाव हिरोशिमा शहराजवळ होते. आमच्या गावाला अणुबॉम्बच्या हल्ल्याची फारशी झळ पोहोचली नाही. परंतु त्या घटनेनंतर सर्वत्र भीतीयुक्त दहशत मात्र पसरली होती. गावावरून एखादे विमानही गेले तरी लोक घाबरून घरात पळायचे, आम्ही तेव्हा खूप लहान होतो. फारसे कळत नव्हते. मात्र त्या अणुुबॉम्बच्या हल्ल्याची जी दहशत लोकांमध्ये होती, ती मात्र आजही स्मरणात आहे.भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी सांगितलेला हा अनुभव. भंते ससाई हे मूळचे जपानचे. इतिहासात पहिल्यांदा अमेरिकेने जपानमध्येच अणुुबॉम्ब टाकला. ६ आॅगस्ट १९४५ रोजी जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुुबॉम्ब टाकण्यात आला. त्यात २० हजार सैनिकांसह दीड लाखावर निरपराध नागरिक मारल्या गेले. त्यानंतर तीन दिवसाने पुन्हा नागासाकी या शहरावर दुसरा अणुुबॉम्ब अमेरिकेने टाकला. यातही ३९ हजार सैनिकांसह लाखो नागरिक मारल्या गेले. या दोन्ही हल्ल्याने केवळ जपानच नव्हे तर संपूर्ण जग हादरून गेले होते.अमेरिकेने पहिल्यांदा ज्या शहरावर अणुबॉम्ब टाकला त्या हिरोशिमा शहराला लागून असलेल्या ओकाहामा शहरातील निमी हे भदंत ससाई यांचे गाव होय. त्या वेळच्या आठवणींना उजाळा देतांना भदंत ससाई यांनी सांगितले की, द्वितीय महायुद्धाचा तो काळ होता. मी १४-१५ वर्षाचा होतो. युद्धाचा तो काळ होता, हे गावातील लोकांच्या चर्चेवरून लक्षात आले होते. हिरोशिमा आणि नागासकी शहरावरील अणुुबॉम्बच्या हल्ल्यात लाखो लोकं मारल्या गेले. माझे गाव हिरोशिमाला लागून होते. आम्हाला त्या हल्ल्याची थेट झळ पोहोचली नाही. मात्र त्या हल्ल्यात मृत्यूचा सडा पडल्याचे गावातील लोक ंसांगायचे.गावातील जी मंडळी शहरात जाऊन येत होती ती तिकडच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीयुक्त दहशत पसरली होती. गावावरून एखादे विमानही गेले तरी लोकं घाबरायचे, घरांमध्ये पाळायचे. पुढील अनेक वर्षे गावात ती दहशत कायम होती. (प्रतिनिधी)