जनता कर्फ्यु; उपराजधानी लॉकडाऊन; रस्ते सुनसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 10:18 AM2020-03-22T10:18:47+5:302020-03-22T10:19:19+5:30

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी पुकारलेल्या देशव्यापी जनता कर्फ्युच्या आवाहनला नागपुरातील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत उपराजधानी लॉकडाऊन केल्याचे दृश्य रविवारी सकाळी अख्ख्या शहरात पहावयास मिळाले .

People Curfew; Sub-capital lockdown; The roads are deserted | जनता कर्फ्यु; उपराजधानी लॉकडाऊन; रस्ते सुनसान

जनता कर्फ्यु; उपराजधानी लॉकडाऊन; रस्ते सुनसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी पुकारलेल्या देशव्यापी जनता कर्फ्युच्या आवाहनला नागपुरातील नागरिकांनी १०० टक्के प्रतिसाद देत उपराजधानी लॉकडाऊन केल्याचे दृश्य रविवारी सकाळी अख्ख्या शहरात पहावयास मिळाले .
रविवारच्या कर्फ्युच्या चर्चा आधीच रंगत होत्या. नागरिकांनी अत्यावश्यक खरेदी शनिवारी संध्याकाळीच उरकली होती. रविवारी सकाळी शहरातील मुख्य बाजारपेठांचा भाग असलेला सीताबर्डी, इतवारी, कॉटन मार्केट हे भाग पूर्णत: बंद होते. महाल हा नागपुरातला गजबजलेला भागही पूर्णपणे सुनसान होता. रस्त्यांवर पोलिसांच्या गाड्या फिरताना दिसत होत्या. तर चौकाचौकात वाहतूक पोलिसांसह खाकी वर्दीतले पोलिसही तैनात होते. रस्त्याने जाणाऱ्या एखाददुसºया व्यक्तीला थांबवून तो कुठे व कशासाठी जात आहे याची चौकशी केली जात होती.

Web Title: People Curfew; Sub-capital lockdown; The roads are deserted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.