संपर्कातून लोक जुळतात
By Admin | Updated: October 2, 2014 01:09 IST2014-10-02T01:09:16+5:302014-10-02T01:09:16+5:30
संपकर् ातून, भेटीगाठीतून मत परिवर्तन होते. सततच्या संपर्कातून लोक जुळतात व पदयात्रा हे लोकसंपर्काचे उत्तम माध्यम आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे मत बदलण्याची ताकद पदयात्रांमध्ये असते,

संपर्कातून लोक जुळतात
काँग्रेस नेत्यांना विश्वास : मौदा येथे पदयात्रा
नागपूर : संपकर् ातून, भेटीगाठीतून मत परिवर्तन होते. सततच्या संपर्कातून लोक जुळतात व पदयात्रा हे लोकसंपर्काचे उत्तम माध्यम आहे. लोकांमध्ये मिसळून त्यांचे मत बदलण्याची ताकद पदयात्रांमध्ये असते, असा विश्वास कामठी विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केला. मौदा तालुक्यातील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
तालुक्यातील बसस्थानकाजवळ काँग्रेस पक्षाचे प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी मुळक यांनी मौदा तालुक्यात पदयात्रा काढून तालुक्यातील गावांमधील नागरिकांशी संपर्क साधला. पदयात्रेच्या माध्यमातून मुळक यांनी संपर्क अभियान राबविले आहे. या माध्यमातून ते ज्येष्ठ नागरिक, युवावर्ग आणि गृहिणींशी संवाद साधत आहेत. बुधवारी त्यांनी तालुक्यातील देवमुंढरी, मोरगाव, धर्मापुरी, नवरगाव, इजनी, खात, घोटमुंढरी, ढोलमारा, आष्टी, शिवनी, आदासा, हिवरा, चिखलाबोडी, पांजरा या गावात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. खात येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून मिरवणूक काढण्यात आली. या पदयात्रेत जि.प. सदस्या बबिता साठवणे, मौदा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर पिसे, तुळशीराम काळमेघ, डॉ. अनिल बोरकर, धर्मराज मदनकर, सरपंच हर्षदास गजबे, राजा तिडके, उमेश गभणे, राजेश निनावे, अशोक वासनिक, राकेश बागडे, ज्योतिपाल गजभिये, ज्ञानेश्वर आकरे, अशोक दीक्षित, नंदलाल पाटील, मेहमुद्दीन तुरक, शंकरराव भिवगडे, लटारू बावनकुळे, नारायण गरवेकर, बारसू क्षीरसागर, राजकुमार ठवकर, ज्ञानेश्वर वानखेडे, डॉ. निखिलेश ढोणे, मुरलीधर भर्रे, रामराव भर्रे, देवराव थोटे, विकास मुळे, सीताराम सोमनाथे, रामसिंग रावते, सुभाष काळे, भाऊराव जगनाळे, कैलास लेंडे, रमेश जगनाळे, सुभाष मेश्राम, लालजी सपाटे, मन्साराम वनवे, सावित्री काटकर, दिलीप सिरसाम, रामप्रसाद पराते, पृथ्वीराज गुजर, राजेश मानकर, संजय जौंजाळकर आदी उपस्थित होते.