जूननंतर केबलची कामे केल्यास दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 11:50 PM2019-05-02T23:50:13+5:302019-05-02T23:51:37+5:30

पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी भूमिगत करण्यात येणारी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबलची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण करा, पावसाळ्याच्या दिवसात कोणतेही खोदकाम करू नये. परवानगी न घेता भूमिगत केबलसाठी खोदकाम केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे.

Penalty action if cable works after June | जूननंतर केबलची कामे केल्यास दंडात्मक कारवाई

जूननंतर केबलची कामे केल्यास दंडात्मक कारवाई

Next
ठळक मुद्देजूनपूर्वी कामे पूर्ण करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी भूमिगत करण्यात येणारी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबलची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण करा, पावसाळ्याच्या दिवसात कोणतेही खोदकाम करू नये. परवानगी न घेता भूमिगत केबलसाठी खोदकाम केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी दिला आहे.
शहरात विविध ठिकाणी ऑप्टिकल फायबर केबल, इलेक्ट्रीक केबल भूमिगत टाकण्यासंदर्भात गुरुवारी अतिरिक्त आयुक्ताच्या अध्यक्षतेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) अमीन अख्तर, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, कार्यकारी अभियंता (वाहतूक) ए.जे. बोदेले, ए.जी. नागदिवे, राजेश भूतकर, अनिरुद्ध चौगंजकर, एम.आर. कुकरेजा, अविनाश बारहाते, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, उपअभियंता डी.एस. बिसेन यांच्यासह एल अ‍ॅन्ड टी , रिलायन्स जिओ, एमएसईडीसीएल,बीएसएनएल, ओसीडब्ल्यू, व्होडाफोन, एसएनडीएल आदी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरात महापालिकेच्या परवानगीने विविध ठिकाणी विद्युत, बीएसएनएल, जिओ आदी केबलसह सिवर लाईन, पाण्याच्या लाईन भूमिगत टाकण्यात आल्या आहेत. यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. हे खोदकाम येत्या जूनपूर्वी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. नवीन व जुन्या सर्व परवानगीधारक विभाग, एजन्सीना ही अट लागू असून जूनच्या कालावधीमध्ये अत्यंत तातडीचे काम असल्यास त्यास विशेष परवानगी देण्यात येईल. अन्यथा मनपातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही रवींद्र ठाकरे यांनी यावेळी सांगतिले.
स्मार्ट सिटीच्या दृष्टीने शहरात कुठेच खोदकाम केलेली माती पडून राहू नये याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. केबल किंवा लाईन टाकल्यानंतर खड्ड्यांमध्ये सीएलएसएम मटेरियल भरण्याचेही त्यांनी निर्देश दिले. याशिवाय आतापर्यंत करण्यात आलेल्या भूमिगत केबलच्या कामाची पाहणी करा, कामे व्यवस्थित स्थितीत न आढळल्यास तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले.
सिमेंट रोडच्या कामापूर्वी केबल टाका
केबल लाईनसाठी खोदकाम करताना सिवरेज, पाण्याची लाईन व बीएसएनएलच्या केबलला बाधा पोहोचणार नाही याची विशेष काळजी घ्या, सिमेंट रस्ते बांधकामाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी केबल टाका, रस्ते बांधकामानंतर कोणत्याही केबलसाठी परवानगी दिली जाणार नाही.महापालिकेच्या दहाही झोनपैकी ज्या झोनमध्ये एमएसईडीसीएलची परवानगी घेण्यात आली नसेल त्यांनी तातडीने परवानगी घेऊ न काम पूर्ण करण्याचेही निर्देश रवींद्र ठाकरे यांनी दिले.

 

 

Web Title: Penalty action if cable works after June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.