मास्क नसलेल्या १०० नागरिकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:08 IST2021-03-18T04:08:28+5:302021-03-18T04:08:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १०० नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून, ...

Penalty for 100 citizens without masks | मास्क नसलेल्या १०० नागरिकांना दंड

मास्क नसलेल्या १०० नागरिकांना दंड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी बुधवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १०० नागरिकांविरुद्ध कारवाई केली असून, त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्वांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६,०८७ नागरिकांविरुद्ध कारवाई करून १ कोटी ६४ लाख २ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.

बुधवारी शोध पथकाद्वारे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ४७, धरमपेठ झोन ४, हनुमाननगर झोन ३, धंतोली ७, नेहरूनगर ८, गांधीबाग ६, सतरंजीपुरा ४, लकडगंज झोन ९, आशीनगर ४, मंगळवारी झोनअंतर्गत ७ आणि मनपा मुख्यालयातील एकाविरुद्ध ही कारवाई केली. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई केली जात आहे.

...

१.४५ लाखाचा दंड

महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी १९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ४५ हजाराचा दंड वसूल केला. ५२ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निदेर्शानुसार ही कारवाई केली जात आहे.

Web Title: Penalty for 100 citizens without masks