बेलाची पाने ताेडणे जीवावर बेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:12 IST2021-03-13T04:12:47+5:302021-03-13T04:12:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : महाशिवरात्री असल्याने बेलाची पाने विकून दाेन पैसे कमवावे, या उद्देशाने ताे बेलाच्या झाडावर चढला. ...

बेलाची पाने ताेडणे जीवावर बेतले
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : महाशिवरात्री असल्याने बेलाची पाने विकून दाेन पैसे कमवावे, या उद्देशाने ताे बेलाच्या झाडावर चढला. पाने ताेडत असताना ताेल गेल्याने ताे ३५ फूट उंचावरून खाली काेसळल्याने गंभीर जखमी झाली. वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाठाेडा शिवारात गुरुवारी (दि. ११) सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
केशव लक्ष्मण बोरघटे (५६, रा. किन्हाळा-सातगाव) असे मृताचे नाव आहे. केशवकडे राेजगाराचे प्रभावी साधन नसल्याने ताे मिळेल ती कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. गुरुवारी महाशिवरात्री असल्याने तसेच भाविक बेलाची पाने विकत घेत असल्याने त्याने बेलाची पाने विकण्याचा निर्णय घेतला. ती ताेडण्यासाठी ताे मुलगा नीलेश(३०)साेबत माेटरसायकलने वाठाेडा शिवारात गेला. बेलाचे झाड दिसताच दाेघेही थांबले.
केशवने मुलाला झाडाखाली थांबण्याची सूचना केली आणि स्वत: झाडावर चढला. पाने ताेडत असताना अचानक ताेल गेला आणि ताे ३५ फूट उंचावरून खाली काेसळला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली, शिवाय परिसरात मदतीला कुणीही नसल्याने मुलगाही घाबरला. त्याने घटनेची माहिती फाेनवरून आईला दिली. तिने शेजाऱ्यांना घेऊन घटनास्थळ गाठले आणि केशवला बुटीबाेरी येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये आणले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी नाेंद करून तपास सुरू केला आहे.