पादचाऱ्याला दुचाकीने उडविले

By Admin | Updated: November 15, 2015 02:16 IST2015-11-15T02:16:32+5:302015-11-15T02:16:32+5:30

भरधाव मोटरसायकलने पायी जाणाऱ्यास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला.

The pedestrians were bicycling | पादचाऱ्याला दुचाकीने उडविले

पादचाऱ्याला दुचाकीने उडविले

बाजारगावजवळ अपघात : कोंढाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नागपूर : भरधाव मोटरसायकलने पायी जाणाऱ्यास धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात ७ नोव्हेंबरला रात्री ९.२० वाजताच्या सुमारास कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारगाव येथे झाला. राजू नत्थू वानखेडे (४०, रा. वरुड) असे मृताचे नाव आहे. राजू हे नागपूर-अमरावती मार्गाने पायी जात होते. दरम्यान एमएच-३१/४०४२ क्रमांकाच्या मोटरसायकलने त्यांना जबर धडक दिली. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना लगेच मेडिकलमध्ये भरती केले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस हवालदार सुधाकर लोहकरे करीत आहे.
शेतातून मोटरपंप पळविला
ओलित करण्यासाठी शेतात लावलेला इलेक्ट्रिक मोटरपंप चोरट्याने पळविला. ही घटना सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केसरनाला शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. महादेव नत्थू बनकर (५०, रा. तेलकामठी) असे फिर्यादी शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी त्यांच्या शेतात ओलित करण्यासाठी विहिरीवर मोटरपंप लावला होता. दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्याने तो पळविला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पवनीत घरफोडी
घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने रोख रकमेसह एकूण ६९ हजारांचा ऐवज चोरून नेला. घरफोडीची ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुदामानगरी, पवनी येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. यासीम कालेखाँ पठाण (४५, रा. सुदामानगरी, पवनी) असे फिर्यादीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी ते आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान चोरट्याने संधी साधत कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ४९ हजारांचे दागिने आणि रोख २० हजार रुपये असा एकूण ६९ हजारांचा ऐवज घेऊन चोरट्याने पळ काढला. ही बाब लक्षात येताच यासीम यांनी देवलापार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यावरून गुन्हा दाखल केला.
जळालेल्या महिलेचा मृत्यू
चुलीतील काड्या पेटवत असताना जळालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठोंबरा येथे मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गीता जागेश्वर रंगारी (३७, रा. ठोंबरा, ता. उमरेड) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला तिच्या घरी चुलीत काड्या पेटविण्याचा प्रयत्न करीत होती. काड्या पेटत नसल्याने तिने त्यावर रॉकेल ओतले. या रॉकेलचा भडका उडाल्याने तिच्या कपड्यांनी पेट घेतला. यात गंभीररीत्या भाजल्याने तिला नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The pedestrians were bicycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.