वाहनाच्या धडकेत पादचारी महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:05+5:302021-02-16T04:10:05+5:30

जलालखेडा : अज्ञात भरधाव वाहनाने रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला जाेरात धडक दिली. त्यातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ...

Pedestrian woman killed in vehicle collision | वाहनाच्या धडकेत पादचारी महिला ठार

वाहनाच्या धडकेत पादचारी महिला ठार

जलालखेडा : अज्ञात भरधाव वाहनाने रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला जाेरात धडक दिली. त्यातच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जलालखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील भारसिंगी शिवारात शनिवारी (दि.१३) रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

कल्पना अरुण चाैधरी (४८, रा. थडीपवनी, ता. नरखेड) असे मृत महिलेचे नाव आहे. ती भारसिंगी येथून नारसिंगी येथे पायी जात हाेती. दरम्यान, भारसिंगीनजीकच्या पुलाजवळ अज्ञात पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनचालकाने तिला मागून धडक दिली. यात तिला गंभीररीत्या दुखापत झाली. तिला जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. याप्रकरणी विशाल अरुण चाैधरी (२५, रा. थडीपवनी, ता. नरखेड) यांच्या तक्रारीवरून जलालखेडा पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फाैजदार जाेशी करीत आहेत.

Web Title: Pedestrian woman killed in vehicle collision