वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:43+5:302021-07-11T04:07:43+5:30

खापरखेडा : भरधाव अज्ञात वाहनाने जाेरात धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. ...

Pedestrian killed in vehicle collision | वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

खापरखेडा : भरधाव अज्ञात वाहनाने जाेरात धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-सावनेर मार्गावरील किल्ले काेलार परिसरात शुक्रवारी (दि. ९) मध्यरात्री घडली.

मृताची ओळख पटू शकली नाही. ताे किल्ले काेलार परिसरात पायी राेड ओलांडत असताना वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्याला जाेदात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या मार्गाने जाणाऱ्यांनी अपघाताची माहिती पाेलिसांना दिली. त्यामुळे पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.

Web Title: Pedestrian killed in vehicle collision