अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:10 IST2021-07-07T04:10:56+5:302021-07-07T04:10:56+5:30

कुही : अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कुही-वडाेदा मार्गावरील भूगाव येथे साेमवारी (दि.५) सकाळी ७ ...

Pedestrian killed in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

कुही : अज्ञात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना कुही-वडाेदा मार्गावरील भूगाव येथे साेमवारी (दि.५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

बंडू शिवदास गायधने (४५, रा. भूगाव, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. मृत बंडू गायधने हे कुही-वडाेदा मार्गाने पायी जात असताना, कुहीच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने त्यांना जाेरात धडक देत धूम ठाेकली. त्यात ते गंभीर जखमी झाले. लगेच त्यांना कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता, डाॅक्टरांनी तपासणीअंती मृत घाेषित केले. याप्रकरणी संजय शिवदास गायधने (४८, रा. भूगाव, ता. कामठी) यांच्या तक्रारीवरून कुही पाेलिसांनी आराेपी वाहनचालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३०४ (अ), सहकलम १३४, १८४ माेटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पाेलीस उपनिरीक्षक तकीत करीत आहेत.

Web Title: Pedestrian killed in collision with unknown vehicle