मेटॅडाेरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:08 IST2021-03-28T04:08:32+5:302021-03-28T04:08:32+5:30

माैदा : भरधाव मेटॅडाेर चालकाने रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने पादचारी तरुणाचा उपचारादरम्यान ...

Pedestrian killed in collision with Matader | मेटॅडाेरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

मेटॅडाेरच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

माैदा : भरधाव मेटॅडाेर चालकाने रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणाला जाेरात धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने पादचारी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माेठा पूल परिसरात नुकतीच घडली.

विलास सुखदेव उसरे (२६, रा. भामेवाडा, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. मृत विलास हा भामेवाडा येथे पायी जात हाेता. दरम्यान, माेठ्या पुलावर एमएच-३६/एफ-१५६५ क्रमांकाच्या भरधाव मेटॅडाेरने त्याला जबर धडक दिली. त्यात विलासला गंभीररीत्या दुखापत झाली. त्यास नागपूर मेडिकल रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान १६ मार्चला त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कैलास सुखदेव उसरे (३२, रा. भामेवाडा, ता. कामठी) यांच्या तक्रारीवरून माैदा पाेलिसांनी भादंवि कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार कुथे करीत आहेत.

Web Title: Pedestrian killed in collision with Matader