बसच्या धडकेत पादचारी ठार
By Admin | Updated: May 29, 2017 13:47 IST2017-05-29T13:47:51+5:302017-05-29T13:47:51+5:30
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे बसच्या धडकेने रस्त्याने चालणाऱ्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २८ मे च्या रात्री १०.३० वाजता सेवासदन दवाखान्यासमोर घडली.

बसच्या धडकेत पादचारी ठार
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली- अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे बसच्या धडकेने रस्त्याने चालणाऱ्या इसमाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २८ मे च्या रात्री १०.३० वाजता सेवासदन दवाखान्यासमोर घडली. यात सॅमसन राजन्ना कोयाडवार वय ४० रा. नागेपल्ली या इसम ठार झाला.
एका कार्यक्रमाहून पत्नीसह पायी घरी जात असताना नागपूरकडून अहेरीकडे जाणाऱ्या बसची सॅमसन याला मागून जोरात धडक बसली. त्यात त्याच्या डोक्याला व तोंडाला जबर मार बसला. त्याला तात्काळ दवाखान्यात नेले मात्र त्याचा मृत्यू झाला. बसचालकाने अहेरी पोलिसात जाऊन या अपघाताची खबर दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.