जिल्हा परिषद शिक्षकांना अविलंब वेतन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:08 IST2021-04-04T04:08:39+5:302021-04-04T04:08:39+5:30
भिवापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना एरवी महिना संपताच मिळणारे वेतन आता विलंबाने मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक समस्यांना सामाेरे ...

जिल्हा परिषद शिक्षकांना अविलंब वेतन द्या
भिवापूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना एरवी महिना संपताच मिळणारे वेतन आता विलंबाने मिळत आहे. त्यामुळे शिक्षकांना आर्थिक समस्यांना सामाेरे जावे लागत असून, वेतनात लेटलतिफी न ठेवता शिक्षकांना वेळेत वेतन देण्याची मागणी अखिल भिवापूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे. याबाबत पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी याेगिराज नवघरे यांच्यामार्फत खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
भिवापूर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षकांपैकी ९० टक्के शिक्षकांनी त्यांच्या पतसंस्थेतून कर्ज घेतले आहे. कर्जाचे हप्ते महिन्याकाठी त्यांच्या वेतनातून कपात केले जातात. मात्र, शिक्षकांचे वेतन महिन्याला वेळेत मिळत नाही. वेतनास विलंब होत असल्याने देय कर्जाच्या व्याजाचा आर्थिक भुर्दंड शिक्षकांना बसत आहे. त्यामुळे शिक्षकांना वेळेत वेतन देण्यात यावे, शिक्षकांची मेडिकल बिल प्रकरणे तात्काळ निकाली काढावी. जीपीएफ मंजुरीचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तात्काळ निकाली काढावे आदी मागण्या निवेदनातून केल्या आहेत. फॉर्म १६ तपासताना काही त्रुटी काढण्यात आल्या होत्या. त्यावर यावेळी चर्चा करण्यात आली. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात आनंद गिरडकर, दिलीप जिभकाटे, विजय चिलबुले, नागोराव बोगाडे, मनोहर बेले, प्रकाश लाडेकर, सुनील चावके, अंबादास मेंघरे, अजय नांदेकर, सुरेश पडोळे, रवींद्र पाटील, अनुराग बोकडे, ओमप्रकाश कांबळे, संदीप जुआरे, कैलास बमनोटे, विकास नारदेलवार, चेतन देवतारे, विकास विंदाने, संतोष तुमडाम, महेश हांडे, शेषराव ढोले, मनोहर ढोबळे आदींचा समावेश होता.