शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

हप्त्याने भरा वीज थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 11:32 IST

महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना २०१७’ जाहीर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना’ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना २०१७’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमुळे वीजबिलांची थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मूळ थकबाकीचे पाच समान हप्त्यात थकबाकी भरता येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.या योजनेत ३० हजारापेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील थकबाकीच्या मूळ रकमेचे पाच समान हप्ते करण्यात आले तर ३० हजारापेक्षा अधिक असलेल्या ग्राहकांना मूळ थकबाकीचे १० समान हप्त्यात भरणा करावयाचा असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीज बिल नोव्हेंबर २०१७ पर्यंत भरून, डिसेंबर २०१७ पासून मूळ थकबाकीपैकी २० टक्क्यांचा पहिला हप्ता थकबाकीदार शेतकऱ्यांना भरावा लागेल. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये २० टक्के, जून २०१८ मध्ये २० टक्के, सप्टेंबर २०१८ मध्ये२० टक्के व डिसेंबर २०१८ अखेरीस २० टक्क्यासह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावयाची आहे. या योजनेत सहभागी न होणाऱ्या थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांवर थकीत वीज बिलांचा अधिक भार पडणार नाही, हे लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांकडील मूळ थकीत रकमेचे पाच समान हप्ते केले आहेत. या योजनेत सहभागी होणाºया शेतकऱ्यांसाठी थकबाकीवरील दंड व व्याज माफ करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण यासाठी येणारा खर्च बघता, वीजबिल भरण्याबाबत शेतकऱ्यांप्रति सकारात्मक विचार करण्याची शासनाची भूमिका आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी शासनाची ही भूमिका समजून घ्यावी व शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले आहे.महाराष्ट्रात एकूण अंदाजे ४१ लाख चालू स्थितीतील कृषी ग्राहक असून, त्यांचा एकूण विद्युत जोडभार २ कोटी १२ लाख एचपी एवढा आहे. सदर ४१ लाख चालू स्थितीतील ग्राहकांपैकी २५.४१ लाख ग्राहकांना मीटरद्वारे व १५.४१ लाख ग्राहकांची वीजजोडणी अश्वशक्तीवर आधारित देण्यात आली आहे. चालू स्थितीतील ग्राहकांपैकी ३७. ६५ लाख ग्राहक हे थकबाकीदार आहेत.३१ मार्च २०१७ पर्यंतचीएकूण थकबाकीमूळ थकबाकी - १०,८९० कोटी रुपयेव्याज - ८,१६४ कोटी रुपयेदंड - २१८ कोटी रुपयेएकूण १९,२७२ कोटीचालू बिल भरल्यास कनेक्शन जोडून मिळेलगेल्या तीन वर्षात एकाही शेतकऱ्यांची वीज कापलेली नाही. चालू महिन्याचे वीज बिल न भरल्यामुळे काही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. त्यांनी सुरू महिन्याचे बिल भरावे व योजनेत सामील व्हावे, त्यांचे कापलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून दिले जाईल, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.शेतकऱ्यांना पाच वर्षांत सौरऊर्जेवर आणण्याचा प्रयत्नशेतकऱ्यांवर विजेचा भार पडू नये म्हणून त्यांना येत्या पाच वर्षात सौरऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये १ मेगावॅट, २ मेगावॅट ते २० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. १ मेगावॅटमध्ये २०० ते २५० शेतकरी, २ मेगावॅटमध्ये ५०० शेतकरी आणि २० मेगावॅटमध्ये साडेचार हजारावर शेतकरी जोडले जातील. त्यांना २ रुपये ९८ पैसे ते ३ रुपये १५ पैशापर्यंत प्रति युनिट वीज उपलब्ध होईल.

टॅग्स :Farmerशेतकरी