डेंग्यू नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्या!

By Admin | Updated: November 23, 2014 00:37 IST2014-11-23T00:37:18+5:302014-11-23T00:37:18+5:30

जिल्ह्यात डेंग्यूचा काळ सुरू आहे. नियंत्रणासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत शुक्रवारी देण्यात आले.

Pay special attention to dengue control! | डेंग्यू नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्या!

डेंग्यू नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्या!

जिल्हा परिषद : आरोग्य समितीच्या बैठकीत निर्देश
नागपूर : जिल्ह्यात डेंग्यूचा काळ सुरू आहे. नियंत्रणासाठी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत शुक्रवारी देण्यात आले.
तालुका स्तरावरील अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, संबंधित कर्मचारी यांनी या कामात कामचुकारपणा केल्यास कारवाई करू. डेंग्यू नियंत्रणासाठी डासांचा उद्रेक असलेल्या गावात रासायनिक धूर फवारणी करावी. यासाठी जि.प.च्या सेस फंडातून फॉगिंग मशीन खरेदी करण्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी दिली.
डेंग्यूचा उद्रेक होऊ नये, यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्यास नजिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र वा आयुर्वेदिक रुग्णालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्याला नेत्र शस्त्रक्रिया व उपचाराचे वार्षिक उद्दिष्ट ३४००० आहे. आॅक्टोबर महिन्यात २०७५ शस्त्रक्र्रि या करण्यात आल्या. यात डागा, उपजिल्हा रुग्णालय, आयुर्वेदिक रुग्णालयांचा सहभाग आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवतापासंदर्भात २६,७९२ रक्त नमुने तपासण्यात आले. यात ३१ नमुने दूषित आढळले. या रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीला सदस्य जयकुमार वर्मा, शुभांगी गायधने, बबिता साठवणे, सरिता रंगारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: Pay special attention to dengue control!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.