शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

दीक्षाभूमी परिसरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या  : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 21:08 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमी येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या.

ठळक मुद्देधम्मचक्र प्रवर्तन दिन पूर्वतयारीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या ६३ व्या सोहळ्यानिमित्त दीक्षाभूमी येथे उपस्थित राहणाऱ्या लाखो अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण करतानाच संपूर्ण परिसर स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शासकीय यंत्रणेला दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे गुरुवारी ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, अतिरिक्त पोलीस आयुक्त बी. जी. गायकर, महापालिकेचे उपायुक्त राम जोशी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य डॉ. सुधीर फुलझेले, नगरसेविका वंदना भगत, विलास गजघाटे, यांच्यासह महापालिका तसेच शहर पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.दीक्षाभूमी येथे दरवर्षीप्रमाणे बौद्ध अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता असून, परिसरात पिण्याचे पाणी, परिसर स्वच्छता, अखंडित वीजपुरवठा,मनपा आणि राज्य परिवहन मंडळाच्या बसेसची व्यवस्था, औषधोपचार व तात्पुरते दवाखाने, फिरते स्वच्छतागृह, पुरेशा प्रमाणात पथदिवे, सुरक्षा व्यवस्था, अन्नदान वाटप, आग प्रतिबंधक उपाययोजना, होर्डींग व सूचना फलक, नियंत्रण कक्ष, सी.सी.टी.व्ही. कॅमेरा लावणे अशा सुविधा तयार ठेवाव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.देशभरातून येणाऱ्या बौद्ध अनुयायांना दीक्षाभूमीकडे जाण्यासाठी मुख्य रेल्वे स्थानक, अजनी रेल्वेस्थानक आणि गणेशपेठ तसेच सीताबर्डी बसस्थानकापासून जागोजागी होर्डींग आणि सूचना फलक लावावेत. तसेच कामठी येथील ड्रॅगन पॅलेसला जाण्यासाठी रस्त्यांच्या बांधकामामुळे आणि वाहतुकीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी नागपूर सिटी बसेसच पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.तसेच कामठी येथील ड्रॅगन पॅलेस आणि परिसराची तात्काळ स्वच्छता करावी. परिसरातील रस्त्यांची डागडुजी आणि वाहनांची संख्या पाहता पर्यायी पार्किंगच्या जागेची सोय करण्याच्या सूचना त्यांनी कामठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुसज्ज रुग्णवाहिका तसेच विविध ठिकाणी मोबाईल स्ट्रेचरची व्यवस्था करावी.पोलीस विभागाने पोलीस नियंत्रण व साहाय्यता कक्ष तयार ठेवावे. आकस्मिक पाऊस, वादळामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, याकडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीcollectorजिल्हाधिकारी