शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

थकीत कर भरा अन्यथा जेलमध्ये जाल  : मनपा आयुक्तांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 21:11 IST

मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल असा इशारा त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देमालमत्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर :नागपूर शहरात ६ लाख १३ हजार मालमत्ता आहेत. यातील. ४ लाख ४३ हजार १४६ मालमत्ताधारकांकडे ५१४ कोटींची थकबाकी होती. यातील १ लाख १० हजार मालमत्ताधारकांनी ६० कोटींची थकबाकी भरली आहे. ३ लाख ३३ हजार ८७ मालमत्ताधारकांकडे ४५४ कोटींची थकबाकी आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत कार्यवाहीचे आदेश आयुक्तांनी मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.थकबाकीदारांना वारंवार अल्टीमेटम देउनही थकीत संपत्ती कर न भरणाºयांना मुंढे यांनी हा इशारा दिला आहे. थकीत संपत्ती कर वसुलीच्या या कठोर कारवाईमधून कोणतीही व्यक्ती सुटू शकणार नाही. कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वेळोवेळी संपत्ती कर भरणा करावा, असे आवाहनही मुंढे यांनी केले आहे.५ लाखांहून अधिक मालमत्ताकराची थकबाकी असलेल्यांची संख्या १७२ आहे. त्यांच्याकडे १७६ कोटींची थकबाकी आहे. चार मोठ्या थकबाकीदारांकडे तब्बल ८६ कोटींची थकबाकी आहे. यात कंटेनर डेपोकडे २८ कोटी, आयनॉक्स १८ कोटी, व्हीआरसीई २० कोटी तर मिहानकडे २० कोटींची थकबाकी आहे. तसेच यात शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. परंतु यातील अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने मागील काही वर्षांपासून थकबाकी वसूल करता आलेली नाही. अशी प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न आहे.थकीत संपत्ती कर वसुली संदर्भात आतापर्यंत झालेली कारवाईकाढण्यात आलेले वारंट-९७४५जप्ती व अटकावणी केलेल्या स्थावर मालमत्ता-२५९५जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढलेल्या मालमत्ता-४९५विक्री प्रमाणपत्र नोंदणीकृत करून हस्तांतरीत मालमत्ता- १२मनपाच्या नावे करण्याच्या कार्यवाहीतील मालमत्ता-१३८

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकरjailतुरुंग