कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना उपचारासाठी अग्रिम रक्कम द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:36+5:302021-04-30T04:10:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशात सर्वत्र कोरोना संक्रमण वाढले आहे. नागपूर शहरातही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. ...

कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना उपचारासाठी अग्रिम रक्कम द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात सर्वत्र कोरोना संक्रमण वाढले आहे. नागपूर शहरातही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. महापालिकेतील कर्मचारी, शिक्षक व सफाई कामगारांना कोरोनाची लागण होत आहे. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होण्यासाठी ५० हजार ते एक लाखापर्यंत रोख रक्कम जमा करण्यास सांगितले जात आहे, त्याशिवाय रुग्णास भरती केले जात नाही. याचा विचार करता बाधित मनपा कर्मचाऱ्यांना उपचारासाठी अग्रिम रोख रक्कम द्यावी, अशी मागणी मनपा कर्मचारी संघटनेने मनपा आयुक्तांकडे केली आहे.
पैशाअभावी अनेक कर्मचाऱ्यांचे मृत्यू होत आहे. प्रशासनातर्फे काही गंभीर आजारावरील उपचारासाठी अग्रिम रक्कम उपलब्ध करून दिली जाते. नंतर त्याचे वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या देयकात समायोजन केले जाते. त्याच पद्धतीचे नियोजन करून कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी अग्रिम रक्कम मिळाली तर उपचार करता येईल. तसेच कोरोनाबाधित कर्मचारी, शिक्षक व सफाई कामगार हे रजेवर असताना त्यांचा पगार कपात वा थांबविण्यात येऊ नये, अशी मागणी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनचे (इंटक) अध्यक्ष सुरेंद टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे, ईश्वर मेश्राम, प्रवीण तंत्रपाळे, बाबा श्रीखंडे, संजय मोहले, मिलिंद चकोले, बळीराम शेंडे, राजू नन्नावरे, गौतम गेडाम, अभय अप्पनवार, पुरुषोत्तम कैकाडे, हेमराज शिंदेकर, देवानंद वाघमारे, विश्वास सेलसुरकर, संजय शिंगणे, नारायण वानखेडे आदींनी केली आहे