शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

विम्याचे १७ लाख रुपये ७ टक्के व्याजासह अदा करा : ग्राहक मंचचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 23:53 IST

दिघोरी येथील तक्रारकर्ते आश्मी रोड करियर्स यांना वाहन विम्याचे १७ लाख ७ हजार ३७७ रुपये ७ टक्के व्याजासह अदा करण्यात यावेत, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिला. तसेच, तक्रारकर्त्याला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.

ठळक मुद्देनॅशनल इन्शुरन्स कंपनीला दणका

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिघोरी येथील तक्रारकर्ते आश्मी रोड करियर्स यांना वाहन विम्याचे १७ लाख ७ हजार ३७७ रुपये ७ टक्के व्याजासह अदा करण्यात यावेत, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिला. तसेच, तक्रारकर्त्याला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीचा खर्च म्हणून १० हजार अशी एकूण ३० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व एस. आर. आजणे यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दणका बसला. व्याज २ डिसेंबर २०१७ ते संबंधित रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कंपनीला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. निर्णयातील माहितीनुसार, तक्रारकर्त्याने त्याच्या ट्रकचा नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून ३० लाख रुपयाचा विमा काढला होता. त्याची मुदत २१ मे २०१६ ते २० मे २०१७ पर्यंत होती. २२ जून २०१६ रोजी मध्यरात्रीनंतर १ वाजता नागपूर-वर्धा रोडवर संबंधित ट्रकचा अपघात झाला. त्यामुळे ट्रक चालक गंभीर जखमी तर, क्लिनरचा मृत्यू झाला. सोनेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर तक्रारकर्त्याने १७ लाख ७ हजार ३७७ रुपये खर्च करून ट्रक दुरुस्त केला. तसेच, आवश्यक बिले व कागदपत्रांसह कंपनीकडे विमा दावा सादर केला. तो दावा विविध कारणांनी २२ जून २०१६ रोजी फेटाळण्यात आला. परिणामी, तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत मंचमध्ये धाव घेतली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.विमा नाकारण्याचे पुरावे नाहीतकंपनीने विमा दावा नाकारण्याच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. याउलट तक्रारकर्त्याने पोलीस एफआयआर, लेखी जबाब इत्यादी दस्तावेज सादर केले. त्यावरून विमा कंपनीने तक्रारकर्त्याचा दावा चुकीच्या कारणावरून नाकारल्याचे व तक्रारकर्त्याला दोषपूर्ण सेवा दिल्याचे सिद्ध होते. परिणामी, तक्रारकर्ता आवश्यक दिलासा मिळण्यासाठी पात्र आहे असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे