पवार, तटकरे यांनी केले अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 00:27 IST2017-10-15T00:27:15+5:302017-10-15T00:27:27+5:30
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पवित्र दीक्षाभूमी येथे.....

पवार, तटकरे यांनी केले अभिवादन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी शनिवारी पवित्र दीक्षाभूमी येथे तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. रक्ताचा एक थेंबही न सांडता जगात शांतीच्या मार्गाने धर्म परिवर्तन झाले असेल तर ते बुध्द धम्माचे. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी येथे १४ आॅक्टोबर १९५६ ला केले. आज देशाला खºया अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अजित पवार यांनी यावेळी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजनीती तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ, होते, त्यांच्या मार्गावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष चालतो, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यावेळी म्हणाले.
याप्रसंगी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार संदीप बाजोरिया, कार्याध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे राजू राऊत , विजय गजभिये, संतोष नरवडे, महिला अध्यक्ष अर्चना हरडे आदी उपस्थित होते.