पावणेदोन कोटींचा गांजा जप्त

By admin | Published: September 9, 2016 03:14 AM2016-09-09T03:14:01+5:302016-09-09T03:14:01+5:30

मरगसूर (ता. काटोल) येथील एका गोदामात ठेवलेला गांजाचा साठा नागपूर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून मोठ्या शिताफीने जप्त केला.

Pavanadon crores of ganja seized | पावणेदोन कोटींचा गांजा जप्त

पावणेदोन कोटींचा गांजा जप्त

Next

नागपूर : मरगसूर (ता. काटोल) येथील एका गोदामात ठेवलेला गांजाचा साठा नागपूर ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून मोठ्या शिताफीने जप्त केला. या कारवाईमध्ये १ कोटी ७४ लाख रुपये किमतीच्या गांजासाठ्यासह एकूण २ कोटी १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाय, १२ जणांना अटक केली. या टोळीचे आंतरराज्यीय कनेक्शन असून, नागपूर ग्रामीण पोलीस याचा सखोल तपास करणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
या कारवाईसंदर्भात पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी सांगितले की, या गांजाची तस्करी विशाखापट्टणम येथून केली जात आहे. काटोल तालुक्यातील मरगसूर गावालगत मनीषसिंहचे फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आणला जातो. हा गांजा कधी व कुठे पोहोचवायचा, याचे निर्देश दिल्लीहून दिले जातात. दरम्यान, सोमवारी सकाळी चिखली (मैना) शिवारात डीएल ४ सी/एबी ६७०० क्रमांकाच्या कारला अपघात झाला. या कारमध्ये १९ लाख रुपये किमतीचा १ क्विंटल ९० किलो गांजा आढळून आल्याने अमितसिंह तोमर व विजयपाल सूरजराम पोई (२७, आरके पुरम, दिल्ली) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांनी या गांजाची उचल मरगसूर येथील फार्म हाऊसमधून केल्याची माहिती मनीषसिंहने पोलीस चौकशीदरम्यान दिली होती.
या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मरगसूर येथील फार्म हाऊसवर धाड टाकली. तिथे एपी-३१/टीटी-९९०२ क्रमांकाचा टिप्पर आढळून आला. टिप्परची झडती घेतली असता, त्यात रेतीखाली १ क्विंटल ७४६ किलो १८० ग्रॅम गांजा आढळला. त्यामुळे या कारवाईत गांजा, टिप्पर तसेच एमएच-३१/सीएम-२०५१ क्रमांकाची कार आणि एमएच-३१/एवाय-३४२५ क्रमांकाची अ‍ॅक्टिव्हा जप्त करण्यात आली, असेही अनंत रोकडे यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहीरकर, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद सराफ, काटोलचे ठाणेदार दिगंबर चव्हाण उल्हास भुसारी व अजाबसिंह जारवाल यांच्या पथकाने केली. (जिल्हा प्रतिनिधी)

अटकेतील आरोपी
गांजा प्रकरणात मनीषसिंह धु्रवकुमारसिंह (३८, रा. मरगसूर, ता. काटोल), रामशरण सिंह रामबालसिंह (४६, रा. मरगसूर, ता. काटोल), निखिलेश दिनेश बक्षी (३१, रा. धरमपेठ, नागपूर) व नागुला विनय संभा शिवडू (३२, रा. कीर्तीनगर, तेलंगणा), गोलू राजपूत शाहू (१९, कानपूर, उत्तर प्रदेश), आनंदकुमार मदनलाल ठकुराल (४५, रा. दिल्ली), जसंवतसिंग पूरणसिंग (४६, रा. टागोर गार्डन, नवी दिल्ली), अरविंदकुमार मुकूल ज्योतीनारायण प्रसाद (३०, रा. पानापूर, जिल्हा मुजफ्फरपूर, बिहार), मुकेशकुमार छित्रपाल (२६, रा. इंद्रपुरी, बुद्धनगर, दिल्ली), सुखवीरसिंग सुनोपचालन सिंग (४५, रा. श्यामनगर, विष्णू गार्डन, नवी दिल्ली), अमीतकुमार हुकूमचंद (२४, रा. सुल्तानपुरी, दिल्ली) व विष्णूदास राजेंद्रदास (३६, रा. इंद्रपुरी, जेजे कॉलनी, नवी दिल्ली) अशा एकूण १२ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

Web Title: Pavanadon crores of ganja seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.