रस्त्याला नाव देऊन नको देशभक्तीची पावती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:06 IST2020-12-27T04:06:54+5:302020-12-27T04:06:54+5:30
फोटो : नारायण रंगनाथ अळेकर. दुसरे छायाचित्र जयश्री व अनिरुद्ध अळेकर -------------- अळेकर कुटुंबीयांनी सादर केले उदाहरण : म ...

रस्त्याला नाव देऊन नको देशभक्तीची पावती ()
फोटो : नारायण रंगनाथ अळेकर. दुसरे छायाचित्र जयश्री व अनिरुद्ध अळेकर
--------------
अळेकर कुटुंबीयांनी सादर केले उदाहरण : म
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावर रस्ता किंवा चौकाचे नामकरण करण्यासाठी आंदोलन होणे ही सामान्य बाब आहे. परंतु घरासमोरच्या रस्त्याला वडिलांचे नाव देण्यास स्वत: मुलाने नकार दिल्याचे उदाहरण निराळेच. विनायकराव अळेकर असे त्या देशभक्त मुलाचे नाव, आणि ज्यांचे नाव रस्त्याला दिले जाणार होते ते म्हणजे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नारायण रंगनाथ अळेकर होत.
१९२० मध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनात मोलाची भूमिका बजावणाऱ्यांपैकी ते एक होते. आयोजनाच्या स्वागत समितीत त्यांची प्रमुख भूमिका होती. त्या काळात ते महाल भागाचे महापालिकेत प्रतिनिधित्व करीत होते. आजही हेडगेवार स्मारकाजवळ त्यांचे कुटुंबीय राहतात. कधीकाळी त्यांचे घर अळेकर वाडा म्हणून प्रसिद्ध होते. परंतु शुक्रवारी रोडच्या रुंदीकरणाच्या कामात त्यांच्या घराचा बराचसा भाग गेला. नारायणराव यांचे नातू अनिरुद्ध हे त्यांची पत्नी जयश्री यांच्यासोबत राहतात. लोकमतची चमू जेव्हा त्यांच्या घरी पोहोचली तेव्हा ते दाेघेही भावनिक झाले होते. आजोबांच्या नावाने आजही परिवाराचा सन्मान होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांना दोन बहिणी आहेत. मोठी बहीण नंदा देशपांडे या रहाटे कॉलनीत राहतात. भाऊ-बहिणींनी आजोबांशी संबंधित स्मृतींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, आजोबा नारायणराव हे जीवनभर काँग्रेसी म्हणूनच राहिले. अनिरुद्ध यांचे वडील विनायकराव मात्र काही काळासाठी ते कम्युनिस्ट पक्षात गेले होते. परंतु नंतर मात्र ते काँग्रेसमध्ये परतले. परंतु अळेकर कुटुंबाने राजकीय संबंधाचा कधी वापर केला नाही किंवा व्यक्तिगत लाभही उचलला नाही. नारायण अळेकर यांचे नाव घरासमोरच्या रस्त्याला देण्याचा प्रस्ताव आला तेव्हा स्वत: त्यांचा मुलगा विनायकराव यांनी विरोध केला. विनायकराव हे स्वत: स्वातंत्र्यसेनानी होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. त्यांचेच पुत्र असलेले अनिरुद्ध सुरुवातीच्या काळात प्रिटिंग प्रेस चालवायचे. व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने ते शिक्षक आमदार प्रभाकर दातार यांच्याशी जुळले. सध्या ते प्रूफरीडिंगचे काम करतात.
बॉक्स
लोकमान्य टिळकांशी जवळचा संबंध
नारायण रंगनाथ अळेकर यांचे ३ मार्च १९५१ रोजी निधन झाले. अनिरुद्ध सांगतात की, त्यांनी कधीच आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. अगदी घरोब्याचे संबंध होते. टिळक हे नागपूरला आले की, ते नारायणराव यांच्या घरी आवर्जून भेट द्यायचे.