१७ दिवसांपासून १०च्या आत रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:12 IST2021-08-20T04:12:42+5:302021-08-20T04:12:42+5:30

नागपूर : टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल झाले असलेतरी दैनंदिन रुग्णसंख्येवर त्याचा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, ...

Patients within 17 to 10 days | १७ दिवसांपासून १०च्या आत रुग्ण

१७ दिवसांपासून १०च्या आत रुग्ण

नागपूर : टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल झाले असलेतरी दैनंदिन रुग्णसंख्येवर त्याचा प्रभाव पडला नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, मागील १७ दिवसांत रुग्णांची संख्या १०च्या आत आहे. गुरुवारी २ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,९८० झाली असून सहा दिवसांपासून मृत्यूची संख्या १०,११८ वर स्थिर आहे.

नागपूर जिल्ह्यात गुरुवारी चाचण्यांची संख्या वाढून ५,११३ झाली. शहरात ३९६२ चाचण्यांमधून १ तर ग्रामीणमध्ये ११५१ चाचण्यांमधून १ रुग्ण आढळून आला. कोरोना संशयित रुग्णांचे नमुने तपासणाºया पाच शासकीय लॅबमध्ये एकही पॉझिटिव्ह आला नाही. खासगी लॅबमधून व अँटिजेन चाचणीतून प्रत्येकी १ रुग्ण बाधित आढळून आला. शहरात रुग्णांची संख्या ३,४०,०४० तर मृतांची संख्या ५,८९३ स्थिर आहे. ग्रामीणमध्ये १,४६,१२४ रुग्ण आढळून आले असून २६०३ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ४ रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण ९७़ ९३ टक्क्यांवर गेले आहे. कोरोनाचा सक्रिय रुग्णांची संख्या एप्रिल महिन्यात ७७ हजारांवर गेली असताना आता १००च्या आत आली आहे. शहरात ८७, ग्रामीणमध्ये ८ तर जिल्हाबाहेरील २ असे एकूण ९७ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ४४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ५३ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत.

:: कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ५,११३

शहर : १ रु ग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,९२,९८०

ए. सक्रीय रुग्ण : ९७

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,७६५

ए. मृत्यू : १०११८

Web Title: Patients within 17 to 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.