मनोरुग्णालयातील रुग्णांचे करणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:09 IST2021-04-07T04:09:24+5:302021-04-07T04:09:24+5:30
आशिष दुबे नागपूर : मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचेसुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने केंद्र सरकारकडून परवानगी ...

मनोरुग्णालयातील रुग्णांचे करणार लसीकरण
आशिष दुबे
नागपूर : मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचेसुद्धा लसीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने केंद्र सरकारकडून परवानगी मागितली आहे. अपेक्षा आहे की, येणाऱ्या दोन दिवसांत परवानगी मिळेल. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १८ ते ४४ वर्षांच्या रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, लसीकरणासाठी आधारकार्ड असणे आवश्यक आहे. ज्या रुग्णाजवळ आधारकार्ड नाही त्यांचे आधारकार्ड बनविण्यात येईल. यासंदर्भात सहनिदेशक डॉ. पद्मजा जोगावार यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या की, रुग्णांचा कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न केला जात आहे. यापूर्वी केंद्रीय आरोग्य विभागाकडे मौखिक परवानगी मागितली होती; परंतु विभागाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. आता पत्र पाठविले आहे, अपेक्षा आहे की, दोन दिवसांत परवानगी मिळेल. त्यानंतर सर्वच रुग्णांचे लसीकरण करण्यात येईल. विशेष म्हणजे, मनोरुग्णालयात एक महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. येथील रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनावर आरोप लावले जात आहेत. मंगळवारी रुग्णालयातील १४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी रविवारी १७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते.