शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

रुग्णांना मिळेल औषधांची माहिती

By admin | Updated: December 22, 2014 00:38 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) काय आहे काय नाही, याला घेऊन डॉक्टर आणि रुग्णांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण राहायचे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी

मेडिकल : झळकणार विविध माहितीचे फलकनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) काय आहे काय नाही, याला घेऊन डॉक्टर आणि रुग्णांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण राहायचे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी यावर उपाय म्हणून विविध माहितीचे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. यात उपलब्ध औषधांची माहितीही रुग्णांना मिळणार आहे. मेडिकलमध्ये काय आहे त्यापेक्षा काय नाही यावरच चर्चा रंगायची. लोकप्रतिनिधीही याच प्रश्नाला घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे. मेडिकलच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण व्हायचा. यामुळे या पद्धतीमध्येच पारदर्शकता आणण्यासाठी डॉ. निसवाडे यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारपासून ते आकस्मिक व बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध व उपलब्ध नसलेल्या औषधांच्या माहितीचे फलक लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात किती व्हेंटिलेटर आहेत त्यातील किती रुग्णाला लावले आहेत याचीही माहिती रुग्णांना मिळणार आहे. ही सोय आतापर्यंत फक्त ‘एम्स’ रुग्णालयात उपलब्ध आहे.(प्रतिनिधी) लवकरच रुग्णाची आॅनलाईन नोंद मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला आता आॅनलाईन आपल्या नावाची नोंद करता येणार आहे. ही सेवा लवकरच सुरू होईल. या विषयी माहिती देताना डॉ. निसवाडे म्हणाले, यामुळे रुग्णालयात नाव नोंदणी करणाऱ्या खिडक्यांवरची गर्दी कमी होईल. तसेच रुग्णाला तत्काळ उपचार मिळू शकेल. या पद्धतीचे काम अंतिम टप्प्यात आहे.