रुग्णांना काेविड चाचणी रिपाेर्टची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:08 IST2021-04-11T04:08:25+5:302021-04-11T04:08:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : काेराेनाची लक्षणे आढळल्यास तसेच सर्दी-खाेकला असल्यास स्थानिक ग्रामीण रुग्णालयात काेविड चाचणी केली जाते. ॲन्टिजन ...

रुग्णांना काेविड चाचणी रिपाेर्टची प्रतीक्षाच
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : काेराेनाची लक्षणे आढळल्यास तसेच सर्दी-खाेकला असल्यास स्थानिक ग्रामीण रुग्णालयात काेविड चाचणी केली जाते. ॲन्टिजन चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी केली जाते; परंतु रिपाेर्ट येईपर्यंत रुग्णाला उपचारार्थ दाखल करायचे कसे, असा पेच काेविड केअर सेंटरमधील डाॅक्टरांसमाेर निर्माण हाेते. आरटीपीसीआर चाचणी रिपाेर्ट येण्यास कुठे पाच तर कुठे १० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे उपचारासाठी विलंब हाेऊन रुग्णांची गैरसाेय हाेत आहे.
भिवापूर ग्रामीण रुग्णालयातील केंद्रात कोविडच्या ॲन्टिजन व आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या केल्या जातात. यात ॲन्टिजन चाचणीचा रिपोर्ट १० ते १५ मिनिटांत प्राप्त हाेताे; परंतु लक्षणे असूनही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास अशा रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जाते. यामध्ये रुग्णाचे स्वॅब घेऊन नागपूर मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाते. साधारणत: नमुने पाठविल्यानंतर एक ते दोन दिवसात रिपोर्ट मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातून पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचे रिपोर्ट नागपूर प्रयोगशाळेतून यायला पाच ते दहा दिवसांचा कालावधी लागत आहे. जोपर्यंत रिपोर्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत रुग्णाला कोविड केअर सेंटरमध्ये प्रवेश दिला जात नाही. या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णांना उपचाराविना राहावे लागत आहे. नागपूर प्रयोगशाळेत नमुने पाठविल्यानंतर तीन-चार दिवसांनी नमुने प्राप्त झाल्याचा मॅसेज रुग्णाच्या मोबाइलवर येतो. त्यानंतर रिपोर्टसाठी रुग्णांना प्रतीक्षाच करावी लागते.
...
वृद्धांना मनस्ताप
चिखली येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेस कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे पाच दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. मात्र, अद्यापही रिपोर्ट आला नाही. वृद्ध महिलेला ऑक्सिजन पातळी कमी वाटू लागल्याने नातेवाइकांनी तिला कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले; परंतु रिपाेर्ट नाही, तर दाखल कसे करायचे, उपचार कसे करायचे, असे सांगत डाॅक्टरांनी वृद्धेला दाखल करण्यास नकार दिल्याची माहिती वृद्धेचे नातेवाईक अमित फुलबांधे यांनी दिली.
...
खासगी डाॅक्टरांची काेंडी
उपचारासाठी आलेल्या रुग्णाला कोरोनाचे लक्षणे आढळल्यास खासगी डॉक्टर कोविडची तपासणी करण्यास सांगत आहे. रिपोर्ट मिळेपर्यंत खासगी डाॅक्टर रुग्णांवर तात्पुरत्या स्वरूपात प्राथमिक औषधोपचारही करतात. मात्र, आठवडा उलटूनही रुग्णाला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा कुठलाही रिपोर्ट मिळत नाही. त्यामुळे पुढील उपचार करायचे तरी कसे, अशी काेंडी खासगी डॉक्टरांची होत आहे.