रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा
By Admin | Updated: July 17, 2015 03:25 IST2015-07-17T03:25:00+5:302015-07-17T03:25:00+5:30
कौतुकायन-२०१५ या आयसीडीच्या समारंभात वैद्यकीय आणि अभियंत्रिकी स्पर्धा परीक्षा, ..

रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा
नागपूर : कौतुकायन-२०१५ या आयसीडीच्या समारंभात वैद्यकीय आणि अभियंत्रिकी स्पर्धा परीक्षा, बारावी व दहावी परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच भव्य सत्कार करण्यात आला. परगावचे विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने संत एकनाथ रंगमंदिर येथे उपस्थित होते.
या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील डॉ. हेडगेवार रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सतीश कुळकर्णी आणि सोलापूरचे सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. राजीव प्रधान उपस्थित होते. रुग्णसेवेचे व्रत हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे मत डॉ. सतीश कुळकर्णी यांनी व्यक्त केले. तर डॉ. राजीव प्रधान यांनी मुलांना सतत शिकत राहण्याचे आवाहन केले. मुलांनी स्वत:च्या क्षमतेबद्दल न्यूनगंड ठेवू नये, असे ते म्हणाले. आयसीडीच्या देदीप्यमान वाटचालीचा सचित्र आढावा डॉ. आशिष मिरजगांवकर यांनी मांडला. विद्यार्थ्यांचे डीएमआयटी पद्धतीने करिअर सिलेक्शन, करिअर गाईडन्स व आवडीनिवडी समजावून घेण्याचे काम आयसीडी करिअर कौन्सिलिंगमध्ये कसे केले जाते, हे डॉ. केतकी हातवळणे यांनी सांगितले. आजवर परदेशात किती विद्यार्थी कोणत्या अभ्यासक्रमासाठी पाठविले, याचा सचित्र अहवाल हातवळणे यांनी मांडला. यावर्षी आयसीडीने मिळविलेल्या उत्तुंग यशाचे रहस्य प्रा. डॉ. सुधीर शिरोडकर यांनी उलगडले आणि २०१४-१५ या वर्षांतील विविध उपक्रमांची माहिती दिली.
यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांपैकी शुभम बांगड, अपूर्वा रंजलकर, संपदा नागरे, गिरीजा दिवेकर, पार्थ धांडे, अपूर्वा गोरे, श्वेता चोपडे आणि प्रतीक्षा देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा. माधुरी देशमुख व प्रा. चारुशिला क्षीरसागर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. प्रफुल्ल मिरजगांवकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. विवेक गोसावी व प्रा. विजय देशमुख यांनी केले. आयसीडीचे कार्यकारी संचालक डॉ. आशिष मिरजगांवकर यांनी आभार मानले. (वा.प्र.)