शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

नागपुरातला पतंजलीचा ‘संथ योग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 1:00 PM

यावर्षीच्या जुलै महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू करून पहिल्या टप्प्यात दोन हजार युवकांना रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या मिहानमधील पतंजलीचे उत्पादन आता वर्ष २०१९ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देउत्पादन पुढील वर्षी सुरू होणाररोजगारावर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षीच्या जुलै महिन्यात प्रत्यक्ष उत्पादन सुरू करून पहिल्या टप्प्यात दोन हजार युवकांना रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या मिहानमधील पतंजलीचे उत्पादन आता वर्ष २०१९ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती आहे.गेल्या काही महिन्यांपासून पतंजलीमध्ये भरतीच्या जाहिराती सोशल मीडियावर प्रकाशित झाल्या आहेत. पण पतंजलीच्या संथ योगामुळे युवकांना पुन्हा काही महिने वाट पाहावी लागणार आहे.पतंजलीने मिहानमधील जागेवर सुरक्षा भिंत उभारून शेडचे काम सुरू केले आहे. काही शेड तयार झाले आहेत. मशीनही आयात केल्या आहेत. घोषणेनुसार बाबा रामदेव यांच्या घोषणेनुसार २०१७ च्या अखेरपर्यंत प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणे अपेक्षित होते. त्यानंतर कंपनीने उत्पादनासाठी पुढील तारखेची घोषणा केली, पण आताही काही तांत्रिक कारणांमुळे नियोजित वेळेत उत्पादन सुरू होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

२५४ एकर जागापतंजलीने मिहानमधील फूड पार्कमध्ये २५४ एकर जागा खरेदी केली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सप्टेंबर २०१६ ला झाले. त्यावेळी बाबा रामदेव यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कंपनीचे सीईओ आचार्य बालकृष्ण उपस्थित होते. त्यावेळी बाबा रामदेव यांनी वर्षभरात उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१७ पर्यंत उत्पादन सुरू होणार होते. पण प्रशासकीय अडचणींमुळे प्रत्यक्ष उत्पादन सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर जुलै २०१८ पर्यंत कंपनीचे एक युनिट सुरू होणार होते. पण तशी शक्यता दिसत नाही. आता शेड उभारणीचे काम सुरू आहे. मशीनरींची उभारणी आणि ट्रायलनंतरच प्रत्यक्ष उत्पादन पुढील वर्षी होणार आहे.

शेतकऱ्यांशी उत्पादनासाठी करारपतंजलीने नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसोबत आवळा आणि कोरफड (अ‍ॅलोव्हिरा) या दोन पिकांसाठी करार केला असून कंपनी खरेदी करणार आहे. त्याकरिता कंपनी या उत्पादनांसाठी शेतकऱ्यांना सर्व मदत करणार आहे. नागपूर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे कंपनी आपली उत्पादने या ठिकाणाहून देशाच्या अन्य भागात नेऊ शकते. त्यामुळेच पतंजलीने नागपूरची निवड केली आहे. रोजगारासाठी कंपनीने लवकरच उत्पादन सुरू करावे, अशी युवकांची मागणी आहे.हजारोंना रोजगार मिळणारपतंजली फूड पार्कमध्ये विदर्भातील हजारो युवकांना रोजगार मिळणार आहे. बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रातही पतंजलीसारखे मोठे उत्पादन युनिट यावेत. त्यामुळे त्यावर आधारित १५० ते २०० लहान कंपन्या सुरू होऊन हजारोंना रोजगार मिळू शकतो. सध्या बुटीबोरीत नव्याने सुरू झालेल्या एका फूड कंपनीत ५०० युवकांना रोजगार मिळाला आहे.- नितीन लोणकर, अध्यक्ष,बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा