लवकरच येणार पतंजलीची 'देशी जीन्स'
By Admin | Updated: September 11, 2016 13:37 IST2016-09-11T13:05:49+5:302016-09-11T13:37:46+5:30
योगगुरु रामदेवबाबांची कंपनी पतंजली आता लवकरच स्वदेशी जीन्स पॅन्ट घेऊन येणार आहे. पतंजलीकडून लवकरच पुरुष व स्त्रीयांसाठी जीन्स बाजारात आणण्यात येणार

लवकरच येणार पतंजलीची 'देशी जीन्स'
-ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.11- योगगुरु रामदेवबाबांची कंपनी पतंजली आता लवकरच स्वदेशी जीन्स पॅन्ट घेऊन येणार आहे. पतंजलीकडून लवकरच पुरुष व स्त्रीयांसाठी जीन्स बाजारात आणण्यात येणार आहे.
गारमेंट क्षेत्रात प्रथमच पतंजली उतरणार असून जीन्ससोबत इतर कपडेही सादर करण्यात येणार आहेत. मात्र, सध्या त्यांनी केवळ जीन्सच्या निर्मितीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या शिवाय पतंजली स्वदेशी शूज देखील बाजारात आणणार आहे.
नागपुरमध्ये झालेल्या मीट द प्रेस या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आयुर्वेदिक,आरोग्य, किराणा, कॉस्मेटिक, आणि फार्मापाठापोठ आता योगगुरु फॅशन इंडस्ट्रीतही उडी घेत आहेत असंच म्हणावं लागेल.