ओसवाल पंचायतीतर्फे ‘पासपोर्ट’ शिबिर
By Admin | Updated: July 13, 2014 01:02 IST2014-07-13T01:02:39+5:302014-07-13T01:02:39+5:30
ओसवाल पंचायतीच्यावतीने समाजबांधवांसाठी खास ‘पासपोर्ट’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. शनिवारी इतवारी येथील ओसवाल पंचयतीच्या कार्यालयात या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

ओसवाल पंचायतीतर्फे ‘पासपोर्ट’ शिबिर
उत्स्फूर्त प्रतिसाद : पहिल्याच दिवशी ७५ जणांनी केली नोंदणी
नागपूर : ओसवाल पंचायतीच्यावतीने समाजबांधवांसाठी खास ‘पासपोर्ट’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. शनिवारी इतवारी येथील ओसवाल पंचयतीच्या कार्यालयात या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायतीचे अध्यक्ष पंकज भंसाली, उपाध्यक्ष विजय धाडिवाल, उपाध्यक्ष अजय बैद, कोषाध्यक्ष विनोद कोचर, शैलेश धाडीवाल, अभय कोठारी, राजीव जव्हेरी व कमलराज धाडीवाल आदी उपस्थित होते. हे शिबिर २५ जुलैपर्यंत चालणार असल्याची माहिती यावेळी शैलेश धाडीवाल यांनी दिली.
विशेष म्हणजे, ओसवान पंचायतीच्यावतीने सप्टेंबर महिन्यात एका विदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा ८ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून, यात सिंगापूर, मलेशिया व लिब्रा क्रुझ या देशांची विदेशवारी केली जाणार आहे. परंतु ही विदेश यात्रा करण्यासाठी प्रत्येकांकडे पासपोर्टची गरज भासणार आहे. ती गरज लक्षात घेता, पंचायतीतर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात पहिल्याच दिवशी सुमारे ७० ते ७५ समाजबांधवांनी पासपोर्टसाठी नोंदणी केली. शिबिर उद्या (रविवारी) सकाळी ११ ते सायं. ६ वाजतापर्यंत चालणार असून, त्यानंतर २५ जुलैपर्यंत सकाळी ११ ते दुपारी १२.३० व सायं. ६ ते रात्री ७ वाजतापर्यंत सुरू राहणार असल्याचे धाडीवाल यांनी सांगितले.
शिबिरात पासपोर्ट काढण्यासाठी इच्छूकांनी जन्माचा दाखला, शाळेचे प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहनचालक परवाना किंवा विजेचे बिल हे दस्तऐवज सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)