शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी घ्यावी नोंद : नागपूर रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक पाच ५२ दिवसांसाठी बंद

By नरेश डोंगरे | Updated: September 7, 2025 18:56 IST

विकासकामांचे निमित्त; आजपासून होणार अंमलबजावणी

नागपूर: मुख्य रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत विविध महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली असून त्याअंतर्गत फलाट क्रमांक पाच सोमवारी, ८ सप्टेंबर २०२५ पासून ५२ दिवसांकरिता पूर्णतः बंद राहणार आहे.

येथील मुख्य रेल्वे स्थानकावर पुनर्विकासांची विविध कामे सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून फलाट क्रमांक पाचचे काम सोमवारपासून सुरू केले जाणार आहे. ते २९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत कॉनकोर्सचे फाउंडेशनचे काम वेगात पार पाडले जाईल, असा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. यामुळे होणाऱ्या अडचणींचा विचार करून गाड्यांच्या संचालनासाठी काही महत्त्वपूर्ण तात्पुरत्या बदलांची माहितीही रेल्वे प्रशासनाने जाहीर केली आहे. फलाट क्रमांक ५ वरून सुटणाऱ्या १८ गाड्यांचे दुसऱ्या फलाटांवरून संचालन केले जाणार आहे.

त्यानुसार ट्रेन नंबर २२१२५/२२१२६ अमृतसर-नागपूर एसी एक्स्प्रेस आता फलाट क्रमांक ७ वरून सुटणार आहे. ट्रेन नंबर ११२०१ नागपूर शहाडोल एक्स्प्रेस फलाट क्रमांक ७ वरून, २०९११/२०९१२ इंदोर नागपूर फलाट क्रमांक ६ आणि ७ वरून आमला मार्गावरून धावणाऱ्या मेमू गाड्या (६१११७ /६१११८/ ६१११९ आणि ६११२०) तसेच वर्धा मार्गावरून धावणाऱ्या ६११०९/६१११० आता फलाट क्रमांक ४ वरून सोडल्या जातील.

वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर पुणे फलाट क्रमांक १, नागपूर सिकंदराबाद फलाट क्रमांक ६, जयपूरला जाणारी गाडी फलाट क्रमांक ३ आणि अहमदाबाद हावडा फलाट क्रमांक ३ वरून जाईल.------------------शॉर्ट टर्मिनेशन व ओरिजिनेशन०११४० मडगाव–नागपूर एस्क्प्रेस ही गाडी आता अजनी येथेच थांबवली जाईल. तर, ०११३९ नागपूर–मडगाव एक्स्प्रेस ही गाडीदेखील अजनी येथून सुरू केली जाईल. या दोन्ही गाड्यांच्या १५ फेऱ्या अशा स्वरूपात राहतील.------------------महत्त्वाची सूचनाया बदलानुसारच मेमू गाड्यांचे नियमन करण्यात आले असून गाडी क्रमांक ६१११७,६१११८, ६१११९ आणि ६११२० या गाड्यांचे वेळापत्रक १०–२० मिनिटांनी बदलले जाईल. हे बदल तात्पुरते असून त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना अॅप किंवा रेल्वे चौकशी पोर्टलवरून माहिती घ्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेnagpurनागपूर