शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त

By नरेश डोंगरे | Updated: August 22, 2024 18:28 IST

Nagpur : अनेक दिवसांपासून विकासकामांचे दाखले देऊन विविध मार्गावरच्या गाड्या रद्द

नरेश डोंगरे - नागपूर        

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वारंवार रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवासी अक्षरश: वैतागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही त्रासदायक मालिका कधी थांबणार, असा प्रश्न त्रस्त झालेले रेल्वे प्रवासी विचारत आहेत.

देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या सर्वच भागात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. येथून ठिकठिकाणी जाणाऱ्या आणि येथे उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. रेल्वेने प्रवास करणारी मंडळी अनेक दिवसांपूर्वीच आपले प्रवासाचे नियोजन करून ठेवतात. कधी, कोणत्या गाडीने जायचे, कधी परत यायचे, हे खूप दिवसांपूर्वीच ठरवून तशा प्रकारे रिझर्वेशन केले जाते. असे असताना ऐनवेळी नियोजन केलेली गाडीच रद्द होत असेल किंवा उशिरा येत असेल तर प्रवासाचे नियोजन गडबडते. गाडी रद्द झाल्यास दुसऱ्या गाडीने जातो म्हटले तर पुन्हा रिझर्वेशनची अर्थात कन्फर्म तिकिटाची समस्या निर्माण होते. गेल्या अनेक दिवसांपासून विकासकामांचे दाखले देऊन विविध मार्गावरच्या गाड्या रद्द करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचप्रमाणे काही गाड्या विलंबाने नागपुरात पोहचत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचे नियोजन रोजच्या रोज बिघडत आहे. रेल्वे प्रशासन रद्द करण्यात आलेल्या किंवा उशिरा पोहचणाऱ्या गाड्यांच्या संबंधाने दिलगिरी व्यक्त करून मोकळे होत आहेत. मात्र, महत्वाच्या कामासाठी, बैठकीसाठी, व्यवहाराच्या संबंधाने बोलणी करण्यासाठी अनेक दिवसांपूर्वीच नियोजन करून ठेवणाऱ्या प्रवाशांना मात्र त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेकडो रुग्ण रोज उपचारासाठी नागपुरात पोहचतात. व्यापारीही खरेदीच्या आणि देवाण-घेवाणीच्या निमित्ताने नागपुरात येतात. मात्र, गाडी रद्द होत असल्याने किंवा विलंबाने धावत असल्याने त्यांना एकाच दिवसात नागपुरात येऊन आणि येथून काम आटोपून परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना येथे मुक्काम करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. वेळही जाते आणि त्रासही होतो. सारखे-सारखे गाड्या रद्द होण्याची आणि वेळेवर गाडी न पोहचण्याची मालिका सुरूच असल्याने ती कधी थांबणार, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.

कर्मचाऱ्यांनाही लेटलतिफीचा फटकानागपूरहून नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या तसेच गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आदी ठिकाणाहून नोकरीच्या निमित्ताने नागपूरात येणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कार्यालयीन वेळ लक्षात ठेवून ही मंडळी रेल्वेने अपडाऊन करण्यासाठी घरून आणि कार्यालयातून बाहेर पडतात. मात्र, उपरोक्त प्रकारामुळे त्यांचेही अनेकदा नियोजन बिघडते. कार्यालयात पोहचण्यास त्यांना उशिर होतो, त्यामुळे कार्यालयीन कामावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे रेल्वेच्या लेटलतिफीचा फटका त्यांनाही सहन करावा लागत आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर