शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या प्रवाशांसाठी मुंबईच्या प्रवाशांना विमानातून उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 14:20 IST

इंडिगो विमानाला पक्ष्याची धडक अन् आकस्मिक लँडिंग

 

नागपूर : इंडिगो एअर लाइन्सच्या नागपुरातून पुण्याला जाणाऱ्या विमानाला पक्ष्याने धडक दिल्यामुळे ते विमानतळावर दुपारी १ वाजता आकस्मिक उतरविण्यात आले. विमान तातडीने माघारी फिरल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, प्रवाशांना इच्छितस्थळी पाठवण्यावरून सावळा-गोंधळ झाल्याने पुणे आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पक्षी धडकलेल्या नागपूर-पुणे विमानातील प्रवाशांना इंडिगोने दुसऱ्या विमानाने दुपारी  पुण्याला रवाना केले. त्याकरिता कंपनीने नागपुरातून मुंबईला दुपारी ४ वाजता जाणाऱ्या विमानातील सर्व प्रवाशांना खाली उतरविले आणि दुपारच्या पुण्याच्या विमानातील प्रवाशांना घेऊन ते पुण्याकडे रवाना केले. या निर्णयामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

असे झाले ‘रिजेक्ट टेक ऑफ’- सोमवारी दुपारी इंडिगोचे नागपूर-पुणे विमान पक्ष्याने धडक दिल्याने ‘रिजेक्ट टेक ऑफ’मध्ये सामील झाले. - हे विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभे आहे. विमानाच्या इंजिनात बिघाड झाला आहे. हा बिघाड आधीचाच असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच ते पुणे येथून नागपुरात उशिरा पोहोचले होते.

प्रवासी या विमानातून त्या विमानातदुपारी १ वाजता पुण्याकरिता झेपावलेल्या इंडिगोच्या विमानाचे आकस्मिक लँडिंग झाल्यानंतर प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यानंतर कंपनीने मुंबईला ४ वाजता जाणाऱ्या इंडिगो कंपनीच्याच विमानातील प्रवाशांना खाली उतरविले आणि त्यांच्या जागेवर आकस्मिक लँडिंग केलेल्या विमानातील प्रवाशांना बसविले. या विमानाने दुपारी ४ वाजता पुण्याकरिता उड्डाण भरले. यामुळे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाली. त्यांनीही गोंधळ घातला. इंडिगोने नंतर या प्रवाशांना सायंकाळी ६ च्या विमानाने मुंबईला रवाना केले.

टॅग्स :airplaneविमानnagpurनागपूरpassengerप्रवासी