पसार चाेरटा वर्षभरानंतर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:10+5:302021-04-04T04:09:10+5:30
नरखेड : सावरगाव (ता. नरखेड) येथे घरफाेडी करून पळून गेलेल्या चाेरट्यास नरखेड पाेलिसांनी वर्षभरानंतर मध्य प्रदेशातून अटक केली. तूर्तास ...

पसार चाेरटा वर्षभरानंतर अटकेत
नरखेड : सावरगाव (ता. नरखेड) येथे घरफाेडी करून पळून गेलेल्या चाेरट्यास नरखेड पाेलिसांनी वर्षभरानंतर मध्य प्रदेशातून अटक केली. तूर्तास त्याच्याकडून काेणताही मुद्देमाल जप्त करण्यात आला नाही. ही कारवाई शुक्रवारी (दि. २) करण्यात आली.
सदाराम पुन्नू कवडती (रा. सावजपाणी, ता. पांढुर्णा, जिल्हा छिंदवाडा) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. त्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने वर्षभरापूर्वी सावरगाव येथे घरफाेडी केली हाेती. त्यानंतर ताे पळून गेला हाेता. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी भादंविचे ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून त्याच्या साथीदारास अटक केली. तेव्हापासून पाेलीस त्याच्या मागावर हाेते. दरम्यान, हाेळीनिमित्त तो त्याच्या मूळ गावी आल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यामुळे पाेलिसांच्या पथकाने सावजपाणी गाठून त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यता ठाणेदार जयपालसिंह गिरासे यांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कोलते, मनीष सोनवणे, कैलास उईके, राजकुमार सातुर, दिगांबर राठोड यांच्या पथकाने केली.