शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्तेच लढाई लढताहेत, पदाधिकारी कधी सक्रिय होणार?, फडणवीसांनी टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 06:12 IST

प्रत्येक कार्यकर्ता-पदाधिकाऱ्याने २०२४ च्या तयारीवर भर दिला पाहिजे, फडणवीस यांचे वक्तव्य.

नागपूर : राज्यातील सरकारविरोधात काही लोक खोट्या गोष्टी पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात विरोधी पक्षात काहीच दम नाही, त्यामुळे भाजपची लढाई ही विरोधकांशी नसून ‘नॅरेटिव्ह’शी आहे. विरोधकांचे खोटे दावे मोडून काढत सकारात्मक दृष्टिकोन समाजापर्यंत नेला पाहिजे. मात्र, ही लढाई कार्यकर्तेच लढताहेत, यात पदाधिकारी कधी सक्रिय होणार, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणिसांच्या बैठकीत ते बोलत होते. 

राज्यात २०-२० चे सरकार असून, अडीच वर्षांसाठीच कार्यकाळ राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता-पदाधिकाऱ्याने २०२४ च्या तयारीवर भर दिला पाहिजे. उर्वरित कालावधीत मला सरकारकडून काय मिळेल, याची पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा करू नये. प्रसंगी त्यागाचीदेखील तयारी ठेवा, असे ते म्हणाले. 

‘मिशन ५१ टक्के’   भाजपचे राज्यात सरकार असले तरी आत्मसंतुष्ट होऊन अतिआत्मविश्वास बाळगू नये. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्याच्या दृष्टीने संघटन बळकट करण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन सी. टी. रवी व बावनकुळे यांनी केले.

अनेक आमदार, जिल्हाध्यक्ष ‘सोशल मीडिया’त ‘फेल’  यावेळी फडणवीस यांनी भाजपतर्फे राज्यपातळीवर घेण्यात आलेल्या ‘सोशल मीडिया’ सर्वेक्षणावरून जिल्हाध्यक्षांना परखड बोल सुनावले. केवळ ९ जिल्हाध्यक्षांचे ‘सोशल मीडिया’वरील काम उत्तम आहे, तर पाचजणांचे काम सरासरी पातळीचे आहे.  १५ जणांचे तर ‘सोशल मीडिया’वर अस्तित्वच नाही. अनेक आमदारांचीदेखील अशीच स्थिती आहे. प्रत्येकाने ‘सोशल मीडिया’वर व्यक्त झाले पाहिजे व पक्षाची भूमिका सातत्याने मांडली पाहिजे, असे ते म्हणाले.    

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरBJPभाजपा