शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पक्ष म्हणजे चालती गाडी, नवीन चढतात, जुने उतरतात : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 22:05 IST

पक्ष हा नेहमी चालत्या गाडीसारखा असतो. त्यात नवीन प्रवासी चढत असतात आणि जुने उतरत असतात. तेव्हा निराश न होण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.

ठळक मुद्देज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांचा सत्कार सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिकूल परिस्थितीत आनंदराव ठवरे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी विचाराशी बांधिलकी जपली आणि पक्षाला मजबूत केले. मात्र, वय झाले म्हणजे कार्यकर्ता संपतो असे होत नाही. कार्यकर्ता हा कधीच निवृत्त होत नाही. पक्ष हा नेहमी चालत्या गाडीसारखा असतो. त्यात नवीन प्रवासी चढत असतात आणि जुने उतरत असतात. तेव्हा निराश न होण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.भारतीय जनता पार्टीच्या शहर व ग्रामीणतर्फे शनिवारी शिक्षक सहकारी बँक सभागृहात पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. कृष्णा खोपडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. सत्ता असली की चांगले दिवस म्हणून आनंद साजरा केला जातो आणि थोडी मरगळही येते. मात्र, चांगल्या काळापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याचा आनंद जास्त मिळतो. एकेकाळी सतरंज्या उचलण्यापासून ते भाषण ठोकण्यापर्यंत सगळीच कामे आम्ही केली आहेत. त्यावेळी एकही माणूस सभेत नसायचा. मात्र, जिद्द होती आणि त्याच जिद्दीच्या भरवशावर आजचा दिवस बघता येत आहे. कार्यकर्त्यांनी आनंदराव ठवरे यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि जोमाने कामाला लागावे, असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले. संचालन डॉ. राजीव पोतदार यांनी केले तर आभार अरविंद गजभिये यांनी मानले.मजबूत पायव्याशिवाय कळसाला महत्त्व नाही : देवेंद्र फडणवीससत्ता गेली की सर्वच गेले, अशी कार्यकर्त्यांची भावना होते. मात्र मजबूत पायव्याशिवाय कळसाचे महत्त्व नसते, हे समजून घ्यावे. कार्यकर्त्यांनी समर्पित भावनांनी काम करावे आणि पायवा मजबूत करावा. कार्यकर्त्यांनी दीपस्तंभासारखे काम करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

माझा काही इतिहास नाही, मला हृदयात ठेवा: आनंदराव ठवरेमाझा स्वत:चाच काहीच इतिहास नाही. माझी विचारांवर श्रद्धा आहे म्हणून पक्षासोबत आहे. मी गेली ५० वर्षे पक्षाचे अहोरात्र काम करतो आहे म्हणून मला पद मिळावे, असे कुठेच लिहून ठेवले नाही. मला केवळ तुमच्या हृदयात ठेवा, अशी भावना आनंदराव ठवरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी स्वत:ची क्षमता ओळखावी आणि परिस्थितीनुसार दुसऱ्याला पुढे करावे. मला सीट मिळाली नाही म्हणून नाराजी व्यक्त करणारे दुसऱ्या कार्यकर्त्यांवर अन्यायच करीत असतात, असे परखड मतही ठवरे यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस