पक्ष विचारांना समर्पित असे व्यक्तिमत्त्व हरपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 14:12 IST2019-08-24T14:12:42+5:302019-08-24T14:12:50+5:30
अरुण जेटली यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. देशात असलेल्या मोजक्या ख्यातनाम वकीलांमध्ये ते अग्रगणी होते.

पक्ष विचारांना समर्पित असे व्यक्तिमत्त्व हरपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाविषयी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. अरुण जेटली यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली आहे. देशात असलेल्या मोजक्या ख्यातनाम वकीलांमध्ये ते अग्रगणी होते. मी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी असण्याच्या कार्यकाळात त्यांच्यासमवेत अनेक समस्या, व प्रश्नांवर चर्चा केली आहे. मी त्यांच्या कार्याला अतिशय जवळून पाहिले आहे. भाजपाच्या विस्तारात त्यांचा फार मोठा व मोलाचा वाटा होता. पक्ष विचारांना समर्पित असणारा नेता आज आपल्याहून हरपला आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या, पक्ष कार्यकर्त्यांच्या दु:खात सहभागी आहे.