पाेलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात ४९७ तरुणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:08 IST2021-02-07T04:08:54+5:302021-02-07T04:08:54+5:30
काेंढाळी : स्थानिक लखाेटिया भुतडा विद्यालयाच्या मैदानावर पाेलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन करण्यात आले असून, यात एकूण ४९७ तरुण-तरुणी ...

पाेलीस भरतीपूर्व प्रशिक्षणात ४९७ तरुणांचा सहभाग
काेंढाळी : स्थानिक लखाेटिया भुतडा विद्यालयाच्या मैदानावर पाेलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन करण्यात आले असून, यात एकूण ४९७ तरुण-तरुणी सहभागी झाले आहेत. या सर्वांना लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. हे प्रशिक्षण शिबिर दाेन महिन्यांपासून सुरू आहे. पुस्तक वितरण कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख, लाखोटिया भुतडा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश शेंबेकर, उपमुख्याध्यापक बबन तागडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास मरकाम, सरपंच केशव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, संजय राऊत, नरेश राऊत, याकूब पठाण, सुरेंद्र कुर्वे, प्रवीण गोडबोले, दुर्गाप्रसाद पांडे, सुधीर गोतमारे, कमलेश गुप्ता आदी उपस्थित होते. अतिथींनी प्रशिक्षणार्थींना लेखी परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. शिवाय, त्यांना प्रश्न व उत्तरांचे स्वरूप समजावून सांगत जिद्द व चिकाटी ठेवण्याचे आवाहन केले.