सेंटर पॉईंट स्कूलच्या पालक-विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:12 IST2021-01-16T04:12:30+5:302021-01-16T04:12:30+5:30
नागपूर : दाभा येथील सेंटर पॉईंट स्कूलमध्ये शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. पण ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची ...

सेंटर पॉईंट स्कूलच्या पालक-विद्यार्थ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
नागपूर : दाभा येथील सेंटर पॉईंट स्कूलमध्ये शुक्रवारी दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. पण ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी भरली नाही, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवले गेले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या मनमानी कारभाराची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
सकाळी ७ वाजता पालक आपल्या पाल्याला घेऊन शाळेत पोहचले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आत घेतले गेले. पण ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेची फी भरली नाही त्या विद्यार्थ्यांना वेगळे बसवून परीक्षा देऊ दिली नाही. यातील काही पालकांची केवळ महिनाभराची फी बाकी होती. परीक्षा घ्या, आजच फी भरतो, अशी विनंती पालकांनी शाळा व्यवस्थापनाला केली. परंतु शाळा व्यवस्थापनाने पालकांचे काहीही ऐकून घेतले नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षापासून वंचित ठेवले, त्या विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्यास गेले. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या या कारभाराविषयी शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शिक्षणाधिकाऱ्यांनी फीसाठी विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये, असे पत्र शाळा व्यवस्थापनाला दिले.