पालकांचा उपसंचालकाच्या कक्षातच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:07 IST2021-07-28T04:07:45+5:302021-07-28T04:07:45+5:30

नागपूर : आरटीई अ‍ॅक्ट व जेजे अ‍ॅक्टसंदर्भात तक्रार निवारण समितीपुढे सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु समितीचा अहवाल आला नाही. ...

Parents stay in the Deputy Director's room | पालकांचा उपसंचालकाच्या कक्षातच ठिय्या

पालकांचा उपसंचालकाच्या कक्षातच ठिय्या

नागपूर : आरटीई अ‍ॅक्ट व जेजे अ‍ॅक्टसंदर्भात तक्रार निवारण समितीपुढे सुनावणी ठेवण्यात आली होती. परंतु समितीचा अहवाल आला नाही. त्यामुळे पीडित पालकांनी शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांच्या कक्षात त्यांच्यापुढेच जमिनीवर बसून ठिय्या दिला.

स्वामी अवधेशानंद पब्लिक स्कूलच्या विरोधात पालकांच्या काही तक्रारी होत्या. त्या तक्रारीनुसार आरटीईच्या कायद्याचे उलंघन, शाळेत पालक आणि शिक्षक समितीची कायदेशीर स्थापना न करणे, अ‍ॅक्टीव्हीटी फी वसुली अशा प्रकारच्या अनेक तक्रारी तक्रार निवारण समितीपुढे ठेवण्यात आल्या होत्या. समितीने सुनावणी घेऊन पुढची कुठलीही प्रक्रिया केली नाही. अहवालही सादर केला नाही. त्यामुळे पालकांचे प्रश्नच सुटू शकले नाही. परिणामी पालकांनी आरटीई अ‍ॅक्शन कमिटीचे अध्यक्ष मो. शाहीर शरीफ, अभिषेक जैन, सचिन कावडकर, प्रशांत पवार, सूचिता राखुंडे यांच्या उपस्थितीत शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयात ठिय्या दिला. यावेळी अर्चना गिरी, नितीन जैन, माधुरी खडेकर, स्वाती कावडकर, आनंद कळंबे, श्याम गुप्ता, राजेश गोसेवाडे, महेश धोंगडे, सुनील कापसे, हेमंत रेवतकर, गोविंद मेश्राम, देवेंद्र भूते, जयंत बेलेकर, रामेश्वर आत्राम, सुनील कुसूरकर, तुलसीदास झाडे, अर्चना धोखे, प्रदीप पाटील, मोतीराम कापगाते, सतीश रेवतकर, शीतल आगरे आदी पालक उपस्थित होते.

Web Title: Parents stay in the Deputy Director's room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.