शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

शिक्षकांनी बदलावी पालकांची मानसिकता : निशा सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 22:51 IST

कॉन्व्हेंटकडे पालकांचे आकर्षण असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या रोडावत आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळा आता कॉन्व्हेंटपेक्षा मागे राहिल्या नाही. डिजिटल तंत्रज्ञानापासून भौतिक सोईसुविधासुद्धा उपलब्ध केल्या आहे. फक्त आता पालकांची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. जि.प. शिक्षकांनी त्यात योगदान द्यावे. आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारलेल्या शिक्षकांनी ही जबाबदारीच घ्यावी, असे आवाहन जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी केले.

ठळक मुद्देआदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉन्व्हेंटकडे पालकांचे आकर्षण असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या रोडावत आहे. पण जिल्हा परिषदेच्या शाळा आता कॉन्व्हेंटपेक्षा मागे राहिल्या नाही. डिजिटल तंत्रज्ञानापासून भौतिक सोईसुविधासुद्धा उपलब्ध केल्या आहे. फक्त आता पालकांची मानसिकता बदलविणे गरजेचे आहे. जि.प. शिक्षकांनी त्यात योगदान द्यावे. आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारलेल्या शिक्षकांनी ही जबाबदारीच घ्यावी, असे आवाहन जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर यांनी केले.जि.प.च्या शिक्षण विभागातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण सभापती उकेश चव्हाण, सभापती आशा गायकवाड, सदस्य रुपराव शिंगणे, शांता कुमरे, पुष्पा देशभ्रतार, रामदास मरकाम, सुरेंद्र शेंडे, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, महिला व बालक कल्याण अधिकारी भागवत तांबे, समाजकल्याण अधिकारी सुकेशनी तेलगोटे, पंचायत विभागाचे अधिकारी राजेंद्र भुयार आदी उपस्थित होते. जि.प.तर्फे दरवर्षी जिल्ह्यातील १३ प्राथमिक व २ माध्यमिक शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले. संचालन धर्मेश दुपारे यांनी केले. आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार यांनी मानले. या शिक्षकांचा झाला सन्माननंदा आनंद गिरडकर जि.प. प्रा. शाळा रानमांगली, सुधा विजयराव नाखले जि.प. उच्च प्रा. शाळा खापरी, नितीन रायबोले प्रा. शाळा कवठा, अनिल भेदे प्रा. शाळा चनकापूर, रमेश कांबळे उच्च प्रा.शाळा गोंडी मोहगाव, जयदेव शिऊरकर जि.प. प्रा. शाळा दिघलवाडी, एकनाथ पवार जि.प. प्रा. शाळा बोरीमांजरा, आशिष रंगारी जि.प. प्रा. शाळा डोडमा, रामोजी गिऱ्हे जि.प. प्रा.शाळा सालवा, प्रकाश जवादे जि.प. उच्च. प्रा.शाळा खैरगाव, महेंद्र सोनवाने, जि.प. प्रा.शाळा चिचाडा, रंजना भगवान वैद्य जि.प. हायस्कूल पाचगांव एकच मिशन जुनी पेन्शन२००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना शासनाने अंशदायी पेन्शन योजना लागू केली आहे. मात्र जुन्याच पेन्शन योजनेचा लाभ शिक्षकांना मिळावा अशी शिक्षकांची मागणी आहे. त्यासाठी आंदोलनेही झाली आहे. आजच्या सत्कार समारंभात सुद्धा नितीन रायबोले या शिक्षकाने जुन्या पेन्शनची मागणी रेटून धरण्यासाठी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ अशी टोपी घालून पुरस्कार स्वीकारला.

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर