अभ्यासावर वडिलांचे नव्हे आईचेच लक्ष

By Admin | Updated: June 26, 2014 00:57 IST2014-06-26T00:57:08+5:302014-06-26T00:57:08+5:30

साधारणत: गणित, विज्ञान यासारख्या विषयांबद्दल वडील मुलांना मार्गदर्शन करताना दिसून यायचे. परंतु बदलत्या जीवन पद्धतीसोबतच हे चित्रदेखील बदलते आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांपेक्षा आईचेच

Parents and mothers only study | अभ्यासावर वडिलांचे नव्हे आईचेच लक्ष

अभ्यासावर वडिलांचे नव्हे आईचेच लक्ष

पालकांची कसरत : स्पर्धेच्या ओझ्यामुळे विद्यार्थी झाले व्यस्त
नागपूर : साधारणत: गणित, विज्ञान यासारख्या विषयांबद्दल वडील मुलांना मार्गदर्शन करताना दिसून यायचे. परंतु बदलत्या जीवन पद्धतीसोबतच हे चित्रदेखील बदलते आहे. मुलांच्या अभ्यासाकडे वडिलांपेक्षा आईचेच जास्त लक्ष असल्याची बाब ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. पुरुषांच्या बरोबरीने नोकरी करणाऱ्या महिलांच मुलांच्या अभ्यासाची जास्त जबाबदारी घेत असल्याचे यातून स्पष्ट होते.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना मुलांसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी मुलांबरोबर त्यांच्या पालकांचीही कसरत होत आहे, असे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. घरात वडिलांना पूर्ण वेळ देता येत नसल्यामुळे आपल्या पाल्याची जबाबदारी नकळत आईवर येऊन पडते. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची मर्जी सांभाळताना थकून जाणाऱ्या आईच्या डोक्यावर मुलांच्या अभ्यासाचेही ओझे असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मुलांना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक पालक प्रयत्नशील असतो. त्यामुळे शाळेतील शिक्षणाव्यतिरिक्त खासगी शिकवणीही लावली जाते तसेच अनेक आईवडील मुलांचा घरीही अभ्यास घेतात. मात्र, पालक म्हणून ही दोघांचीही समान जबाबदारी असताना मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांच्या शिक्षणाकडेही आईलाच लक्ष द्यावे लागते. त्यांचा गृहपाठ
करून घेणे, त्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी ती प्रयत्न करीत असते. परंतु, काही वेळा बदलत्या अभ्यासक्रमामुळे मुलांच्या अभ्यासातील अडचणी सोडवणे पालकांना कठीण जाते. त्यामुळे पालक खासगी शिकवण्या लावण्याला प्राधान्य देतात.
सर्वेक्षणामध्ये तब्बल ३७ टक्के मुलांच्या बाबतीत असे आढळून आले, की मुलांचे आईवडील नोकरी करतात. तर, ४१ टक्के मुलांचा अभ्यासही आईला घ्यावा लागतो. मुलांचा अभ्यास घेण्यात केवळ १५ टक्के वडील सक्रिय असल्याचे समोर आले आहे. दोघेही मिळून अभ्यास घेणाऱ्या पालकांची टक्केवारी ३५ टक्के आहे. सर्वेक्षणामध्ये सुमारे ९ टक्के मुलांचा अभ्यास घरी कुणीही घेत नसल्याचेही दिसून आले. या मुलांना शाळा आणि खासगी शिकवणीमधील अभ्यासावरच अवलंबून राहावे लागते. (प्रतिनिधी)

Web Title: Parents and mothers only study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.