पार्सलची माहिती ‘आॅनलाईन’
By Admin | Updated: February 4, 2015 00:55 IST2015-02-04T00:55:03+5:302015-02-04T00:55:03+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर नव्यानेच सुरू करण्यता आलेल्या पार्सल व्यवस्थापन यंत्रणेचा शुभारंभ विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. नव्या यंत्रणेमुळे नागरिकांना

पार्सलची माहिती ‘आॅनलाईन’
नागरिकांना सुविधा : ओ. पी. सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर नव्यानेच सुरू करण्यता आलेल्या पार्सल व्यवस्थापन यंत्रणेचा शुभारंभ विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह यांच्या हस्ते करण्यात आला. नव्या यंत्रणेमुळे नागरिकांना आपल्या पार्सलबाबतची माहिती आॅनलाईन कळणार आहे. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉ. जयदीप गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती.
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात पहिल्यांदा आधुनिक पार्सल व्यवस्थापन यंत्रणेची सुरुवात करण्यात आली आहे. विभागात सुरू झालेल्या या यंत्रणेमुळे आता आपल्या पार्सलची नोंद केलेले ग्राहक आपल्या पार्सलची माहिती इंटरनेटवरून पाहू शकतात. या यंत्रणेच्या माध्यमातून पार्सलचे वजन आणि बुकिंग एकाच खिडकीतून होणार आहे. यामुळे पार्सल बुकिंगच्या वेळेतही बचत होणार आहे. नव्या यंत्रणेत पार्सलच्या भाड्याची मोजणी आॅटोमॅटिक आणि त्वरित होऊन यात मानवी चुकीची शक्यता उरणार नाही. पार्सल पाठविण्याबाबतही या यंत्रणेत योग्य प्रकारे देखरेख ठेवता येणार आहे. नव्या यंत्रणेत ग्राहकांच्या तक्रारी कमी होऊन ग्राहकांना द्यावयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेतही बचत होणार आहे. यात सर्व प्रकारचे व्यवहार संगणकीकृत करण्यात आले असून, पार्सलची नोंदणी करणाऱ्यांना पार्सलची सूचना एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहे. लवकरच ही यंत्रणा बल्लारशा रेल्वेस्थानकावर सुरू करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)