विप्र फाऊंडेशनतर्फे परशुराम जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:08 IST2021-05-15T04:08:45+5:302021-05-15T04:08:45+5:30
- रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विप्र फाऊंडेशनच्या वतीने कोरोना श्री परशुराम जयंतीच्या पर्वावर ...

विप्र फाऊंडेशनतर्फे परशुराम जयंती
- रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विप्र फाऊंडेशनच्या वतीने कोरोना श्री परशुराम जयंतीच्या पर्वावर विविध आरोग्यविषयक उपक्रमांसह रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यासोबतच टांगा स्टॅण्ड चौक, इतवारी येथील कार्यालयात परशुरामाचे पुजन व पं. राजेंद्र शर्मा यांचे परशुराम भजन आयोजित करण्यात आले होते.
मुख्य संयोजक उपाध्यक्ष विक्रम शर्मा यांच्या नेतृत्त्वात विष्णू शर्मा, भावेश जोशी, भूषण बिस्सा यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटिचे सरचिटणीस रामकिशन ओझा यांनी ऑक्सिजन मिशन भेट दिली. यावेळी श्री राजस्थानी गौड ब्राह्मण समिती, पालिवाल सेवा मंडळ, श्री दाधिच समाज, श्रीमाली ब्राह्मण समाज, पुष्करणा ब्राह्मण समाज, लालसोट ब्राह्मण सभा, पंजाबी ब्राह्मण समाज, पारिक ब्राह्मण समाज, गुजराती ब्राह्मण समाज, परशुराम सर्वशाखीय ब्राह्मण संघटनांचा सहभाग होता. यावेळी आ. गिरीश व्यास, महेश पुरोहित, महेंद्र शर्मा, विनोद चतुर्वेदी, संजय पालीवाल, अतुल कोटेचा, देव शर्मा, विक्रम शर्मा, विष्णू शर्मा, भावेश जोशी, भूषण बिस्सा, गणेश मार्कण्डेय, दीपक मार्कण्डेय, संजय चतुर्वेदी, राकेश मिश्रा, जयभगवान शर्मा, उमाकांत अग्निहोत्री उपस्थित होते.
..................