शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या पेपरफुटीचे नागपूरच्या विद्यार्थ्यांना टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने सीबीएसई पुन्हा फेरपरीक्षा घेणार आहे. दुबार पेपर द्यावा लागणार असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत. पालकांनीही बोर्डाच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते, पेपर दिल्लीत फुटला आहे, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ...

ठळक मुद्देगुणांवर परिणाम होण्याची भीती : प्राचार्य म्हणतात, रिलॅक्सेशन मिळायला हवे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने सीबीएसई पुन्हा फेरपरीक्षा घेणार आहे. दुबार पेपर द्यावा लागणार असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत. पालकांनीही बोर्डाच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते, पेपर दिल्लीत फुटला आहे, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेतून रिलॅक्सेशन द्यायला हवे.दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अतिशय सजग असतात. स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता टिकविण्यासाठी विद्यार्थीही प्रचंड मेहनत घेतात. रात्रंदिवस एक करून अभ्यास करतात. अशात झालेला पेपर पुन्हा द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येते. सध्या सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी अशाच दडपणात अडकले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत गणिताचा पेपर व बारावीच्या परीक्षेत अर्थशास्त्राचा पेपर फुटला आहे. बोर्डाने हे दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख २५ एप्रिल घोषित केली आहे तर दहावीच्या पेपरच्या बाबतीत बोर्डाने दिल्ली, हरियाणा हे दोन राज्य वगळता इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले आहे. त्यामुळे नागपुरातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचा पेपर द्यायचाच आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी चांगलेच दडपणात आहेत.मुलांची मानसिकता राहत नाहीमुळात सीबीएसईचे विद्यार्थी अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करतात. कॉपी करणे, परीक्षेपूर्वी पेपर मिळविणे या भानगडीत ते पडतच नाही. अशात बोर्डाच्या चुकीमुळे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना फटका बसत असेल तर ते मानसिक दडपणात जातात. एकदा पेपर दिल्यानंतर पुन्हा त्याच पेपरची तयारी करणे त्यांच्यासाठी अतिशय अवघड जाते. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवरही होऊ शकतो.राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य, सेंट पॉल स्कूल मुले नाराज झालीविद्यार्थी पेपर दिल्यानंतर अतिशय आनंदी होते. त्यांना जेव्हा कळले की पेपर फुटल्याने फेरपरीक्षा घेण्यात येईल तेव्हा ते नाराज झाले होते. सीबीएसई बोर्डाने एक चांगले केले की दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यातून रिलॅक्स केले. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागणार आहे. मुळात पेपर हा दिल्ली येथे फुटला आहे. त्याचा परिणाम इतर राज्यांत किंचीतही झाला नसेल. पण शिक्षा मात्र सर्वच विद्यार्थ्यांना मिळते आहे. बोर्डाने जसा दहावीच्या बाबतीत निर्णय घेतला तसेच निर्णय बारावीच्या विद्यार्थ्यांबाबतही घ्यायला हवा, अशी अपेक्षा आहे.कविता नागराजन, प्राचार्य, स्कूल आॅफ स्कॉलर आता अभ्यासाचा मूड नाहीएकदा पेपर झाल्यावर पुन्हा त्याच पेपरचा अभ्यास करणे अतिशय अवघड जाते. दिल्लीच्या चुकीचा फटका आम्हाला बसतोय. पण पर्याय नाही. पेपर तर द्यावाच लागेल. पण आता अभ्यासाचा मूड राहिलेला नाही.रजत फडणीस, विद्यार्थीसीबीएसईचे विद्यार्थी पोहचले गडकरींकडेमहाराष्ट्रात कुठेही पेपर फूट झालेली नाही. तरीही आम्हाला त्याचा फटका का, असा सवाल सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडेच केला आहे. शहरातील ५० ते ६० बारावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात भेट दिली. गडकरी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना रविवारी बोलाविण्यात आले आहे. रविवारी १५० ते २०० विद्यार्थी व पालक गडकरींची भेट घेणार आहे. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सीबीएसई बोर्डाचा दहावीचाही पेपर फुटला होता. परंतु बोर्डाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले. तसेच रिलॅक्सेशन बारावीच्या विद्यार्थ्यांनाही देण्यात यावे. वर्षभर अभ्यास करून पेपर दिला आहे. झालेल्या पेपरचा पुन्हा अभ्यास करणे अडचणीचे जाणार आहे. त्यामुळे पेपर रद्द करावा.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन